Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंडिगोच्या वैमानिकांना ८ ते ५५ लाख पगार

इंडिगोच्या वैमानिकांना ८ ते ५५ लाख पगार

वैमानिकांना ताफ्यात राखून ठेवण्यासाठी प्रामुख्याने विमान कंपन्या त्यांची पगारवाढ करताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 11:54 AM2023-10-01T11:54:24+5:302023-10-01T11:54:33+5:30

वैमानिकांना ताफ्यात राखून ठेवण्यासाठी प्रामुख्याने विमान कंपन्या त्यांची पगारवाढ करताना दिसत आहेत.

8 to 55 lakh salary for Indigo pilots | इंडिगोच्या वैमानिकांना ८ ते ५५ लाख पगार

इंडिगोच्या वैमानिकांना ८ ते ५५ लाख पगार

मुंबई : वर्षाकाठी ८ लाख ते ५५ लाख रुपये किंवा त्याहीपेक्षा अधिक रकमेचा पगार घेणाऱ्या इंडिगो कंपनीच्या वैमानिकांना १० टक्क्यांची पगारवाढ देण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी येत्या १ ऑक्टोबरपासून होणार आहे. वैमानिक व विमानातील केबिन कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांकरिता ही पगारवाढ लागू करण्यात आली आहे. देशातील विविध कंपन्यांतर्फे सध्या मोठ्या प्रमाणावर विस्तार योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे वैमानिकांना देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अशावेळी वैमानिकांना ताफ्यात राखून ठेवण्यासाठी प्रामुख्याने विमान कंपन्या त्यांची पगारवाढ करताना दिसत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, किमान ७० तास कामासाठी ही पगारवाढ लागू करण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक काम केल्यास ओव्हरटाईमनुसार पैसे देण्यात येतील. वैमानिकांच्या अनुभवानुसार ही पगारवाढ लागू होईल. कोरोना काळात कंपनीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला होता. मात्र, कोरोनाचे सावट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा लोकांनी मोठ्या प्रमाणावर विमान प्रवासास पसंती देण्यास सुरुवात केली आहे. याचा सर्वाधिक लाभ हा इंडिगो कंपनीला झाला आहे. देशाच्या विमान क्षेत्रात कंपनीची हिस्सेदारी ६० टक्के इतकी आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीने ३०९० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला.

Web Title: 8 to 55 lakh salary for Indigo pilots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indigoइंडिगो