Join us

८0 टक्के भारतीय रोखीनेच भरत आहेत बहुतांश बिले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 3:58 AM

सुमारे ८0 टक्के भारतीय आपली मल्टी-युटिलिटी (वीज, पाणी, गॅस, प्रवासाची तिकिटे) बिले भरण्यासाठी रोख रकमेचा वापर करतात, अशी माहिती ‘एक्सपे डॉट लाइफ’चे सीईओ आणि सीएमडी रोहितकुमार यांनी दिली.

नवी दिल्ली : सुमारे ८0 टक्के भारतीय आपली मल्टी-युटिलिटी (वीज, पाणी, गॅस, प्रवासाची तिकिटे) बिले भरण्यासाठी रोख रकमेचा वापर करतात, अशी माहिती ‘एक्सपे डॉट लाइफ’चे सीईओ आणि सीएमडी रोहितकुमार यांनी दिली.रोहितकुमार यांनी सांगितले की, गुगल बीसीजी अहवालानुसार, सध्या देशातील फक्त २0 टक्के लोक आपली मल्टी-युटिलिटी बिले क्रेडिट आणि डेबिट कार्डाद्वारे अदा करीत आहेत. उरलेले ८0 टक्के लोक बिले भरण्यासाठी रोख रकमेचाच वापर करतात. यात बदल करणे शक्य आहे.‘एक्सपे डॉट लाईफ’ कंपनीकडून टच स्क्रीन किआॅस्क, वेब, मोबाइल अ‍ॅप, पीओएस उपकरणे आणि मोबाइल एटीपी व्हॅन्स यांसारख्या बिल पेमेंट सेवांना एका तंबूत आणण्यात आले आहे. कंपनीकडून सध्या झारखंड, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांत सेवा देण्यात येत आहे. कंपनीची सेवा असलेल्या प्रमुख शहरांत पुणे, दिल्ली, पाटणा, राजकोट, सुरत, अहमदाबाद आणि बंगळुरू यांचा समावेश आहे.रोहितकुमार यांनी सांगितले की, बिले भरण्यासाठी लोकांना डिजिटल मोडवर आणण्यासाठी आमची कंपनी काम करते. शहरांमध्ये आम्हाला चांगल्या संधी आहेच, पण ग्रामीण भागातही हळूहळू संधी निर्माण होत आहेत. खरे म्हणजे आम्हाला फारशी स्पर्धाच नाही.रांगा होतील कमीनम्मा मेट्रो, दिल्ली मेट्रो अथवा मुंबई मेट्रोने प्रवास करीत असाल, तर तुमच्या लक्षात येईल की, तिकीट खिडकीवर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. ‘तिकीट व्हेंडिंग मशीन’वर जाऊन लोक या रांगा टाळू शकतात.शिवाय लोकांना अधिक गतिमान सेवाही मिळू शकते. सरकारी इमारती, बिलिंग काउंटर्स आणि स्वयंसेवा केंद्रे या ठिकाणीही अशाच रांगा असतात. या रांगा डिजिटल व्यवहारांनी कमी होऊ शकतील.

टॅग्स :भारतअर्थव्यवस्था