नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतून येत्या दोन वर्षांत अधिकारी व कर्मचारी मिळून जवळपास ८० हजार जण निवृत्त होणार आहेत. यामुळे मोठ्या संख्येने रिक्त जागा असतील.या बँकांत ३९,७५६ अधिकारी व कर्मचारी आर्थिक वर्ष २०१५-२०१६ मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. यातील १९,०६५ अधिकारी तर १४,६६९ लिपिक वर्गीय कर्मचारी आहेत. याशिवाय ०६,०२२ उपकर्मीदेखील याच वर्षात निवृत्त होत आहेत. २०१६-२०१७ आर्थिक वर्षात १८,५०६ अधिकारी व १४,४५८ लिपिक वर्गीय कर्मचारी निवृत्त होतील.देशात स्टेट बँक आॅफ इंडिया, आयडीबीआय आणि भारतीय महिला बँकेसह एकूण २२ सरकारी बँका आहेत. स्टेट बँकेच्या पाच सहायक बँका आहेत. मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या पातळीवरील पदे मोठ्या संख्येने रिक्त होत आहेत. त्यामुळे कर्मचारी भरतीमध्ये लवचिकता आणण्याची गरज आहे व अर्थमंत्रालय तसा लवचिकतेबद्दल विचारही करीत आहे. गेल्या आठवड्यात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बँक कॅम्पस नियुक्ती करण्यास इच्छुक असल्याचे व त्यात काही कायदेशीर अडचणीही असल्याचे म्हटले होते. उच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अशा नियुक्त्यांसाठी लवचिक धोरण राबविण्यात अडथळे आहेत, असेही जेटली म्हणाले होते.
८0 हजार बँक कर्मचारी होणार निवृत्त!
By admin | Published: August 16, 2015 10:02 PM