लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बँका, म्युच्युअल फंड तसेच ईपीएफओसह अनेक प्रकारच्या गुंतवणुकीत तब्बल ८० हजार काेटी रुपये पडून आहेत. या रकमेवर दावा करण्यासाठी काेणीही दावेदार पुढे आलेला नसल्याने ही रक्कम दरवर्षी वाढत आहे. यावर एका संस्थेने एक पर्याय सुचविला आहे.
काही दिवसांपूर्वी ईपीएफओने सांगितले हाेते, की पीएफ खात्यांमधील २६ हजार ४९७ काेटी रुपयांवर काेणीही दावा केलेला नाही. याशिवाय बँकांमध्ये अनेक मुदत ठेवीदेखील दावेदार पुढे न आल्याने पडून आहेत. नाॅमिनी (नामांकन) न जाेडल्यामुळे अनेक खात्यांमध्ये ८० हजार काेटी रुपयांहून अधिक रक्कम पडून आहे. त्यासाठी एक अलर्ट फीचर विकसित केले आहे. खाते ॲक्टिव्ह न राहिल्यास नाॅमिनीला त्याबाबत एसएमएस किंवा ई-मेलवर सूचना मिळेल. बँका तसेच इतर ब्राेकरेज कंपन्यादेखील अशा प्रकारच्या सुविधेचा वापर करतील.
अनेक खात्यांबाबत नाॅमिनीला माहितीच नसल्यामुळे रकमेचा दावा सादर करण्यास काेणी पुढे येत नाही. अशा स्थितीत अलर्ट फीचर उपयाेगी ठरू शकते. यामुळे नाॅमिनीला माहिती प्राप्त हाेईल.