Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण; शिक्षणानुसार नोकरी मिळेना, पगार वाढेना, भेदभाव कायम

देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण; शिक्षणानुसार नोकरी मिळेना, पगार वाढेना, भेदभाव कायम

Unemployment In India: भारतातील एकूण बेरोजगारांमध्ये तरुणांची संख्या जवळपास ८३ टक्के असून, उच्च माध्यमिक ते उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 07:35 AM2024-04-01T07:35:35+5:302024-04-01T07:36:31+5:30

Unemployment In India: भारतातील एकूण बेरोजगारांमध्ये तरुणांची संख्या जवळपास ८३ टक्के असून, उच्च माध्यमिक ते उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे.

83 percent of unemployed youth in the country; Not getting job according to education, salary not increasing, discrimination continues | देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण; शिक्षणानुसार नोकरी मिळेना, पगार वाढेना, भेदभाव कायम

देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण; शिक्षणानुसार नोकरी मिळेना, पगार वाढेना, भेदभाव कायम

- चंद्रकांत दडस
 नवी दिल्ली - भारतातील एकूण बेरोजगारांमध्ये तरुणांची संख्या जवळपास ८३ टक्के असून, उच्च माध्यमिक ते उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. देशात तरुणांना किमान १४,२१८ रुपये, तर तरुणींना १६,१२४ रुपये सरासरी मासिक पगारावर मिळेल ती नोकरी धरावी लागत आहे. बेरोजगारीची समस्या प्रामुख्याने शहरी भागातील सुशिक्षित तरुण आणि महिलांमध्ये वाढल्याचे समोर आले आहे.

कंत्राटी कामगार वाढले
सध्या देशातील ९० टक्के कामगार अनौपचारिक कामात गुंतलेले आहेत. विशेषतः बिगर कृषी, संघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकरीमध्ये असुरक्षितता आहे. देशात कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणात वाढले असून, केवळ मोजके कर्मचारी नियमित आहेत. 

कौशल्यच नाही...
- कामगारवर्गात तरुण वर्गाचा मोठा भरणा असला तरी त्यांच्याकडे नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये नाहीत. 
- ७५ टक्के तरुणांना अटॅचमेंट करून ई-मेल पाठवता येत नाही. 
- ६० टक्के तरुण मजकूर अथवा फाइल कॉपी पेस्ट करू शकत नाहीत. 
- ९० टक्के तरुणांना गणिताची सूत्रे स्प्रेडशीटमध्ये कशी टाकायची, हे माहिती नाही.
- अनेक उच्चशिक्षित तरुण कमी पगाराच्या, असुरक्षित नोकऱ्या स्वीकारण्यास तयार नसून, ते अधिक चांगली नोकरीची वाट पाहत आहेत.

संधी कुठे कमी झाली, कुठे वाढली?
कृषी क्षेत्र     (-१.२%)
युटिलिटी क्षेत्र     (-०.२%)
व्यापार     (-०.२%)
वाहतूक, स्टोअरेज     (-०.२%)
व्यवसाय सेवा     (-१.६%)
शिक्षण व आरोग्य     (-०.२%)
संरक्षण     (०.०%)
उत्पादन     १.७%
इतर सेवा     २.०%
बांधकाम     ०.३%
माहिती क्षेत्र     ०.९%
सर्वाधिक संधी सेवा क्षेत्रात दिसून येते. बांधकाम क्षेत्रात कमी संधी आहे.

Web Title: 83 percent of unemployed youth in the country; Not getting job according to education, salary not increasing, discrimination continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.