Lokmat Money > बिझनेस न्यूज > ईजीप्तवरून ८४ टन कांदा मुंबईमध्ये दाखल महागाई रोखण्यासाठी आयात : आठ दिवसामध्ये १ हजार टन आवक होणार

ईजीप्तवरून ८४ टन कांदा मुंबईमध्ये दाखल महागाई रोखण्यासाठी आयात : आठ दिवसामध्ये १ हजार टन आवक होणार

नामदेव मोरे, नवी मुंबई : कांद्याचे गगनाला भिडलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याची आयात सुरू झाली आहे. ईजीप्तवरून तिन कंटेनरमधून ८४ टन कांदा जेएनपीटीमध्ये आला असून शनिवारी तो मुंबईत वितरीत केला जाणार आहे. पुढील आठवड्यात जवळपास १ हजार टन कांद्याची आयात होणार असून त्यामुळे भाव काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

By admin | Published: August 22, 2015 12:43 AM2015-08-22T00:43:34+5:302015-08-22T00:43:34+5:30

नामदेव मोरे, नवी मुंबई : कांद्याचे गगनाला भिडलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याची आयात सुरू झाली आहे. ईजीप्तवरून तिन कंटेनरमधून ८४ टन कांदा जेएनपीटीमध्ये आला असून शनिवारी तो मुंबईत वितरीत केला जाणार आहे. पुढील आठवड्यात जवळपास १ हजार टन कांद्याची आयात होणार असून त्यामुळे भाव काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

84 tonnes of onion imported from Eighth, imported to prevent inflation: 1 thousand tonnes in arrivals in eight days | ईजीप्तवरून ८४ टन कांदा मुंबईमध्ये दाखल महागाई रोखण्यासाठी आयात : आठ दिवसामध्ये १ हजार टन आवक होणार

ईजीप्तवरून ८४ टन कांदा मुंबईमध्ये दाखल महागाई रोखण्यासाठी आयात : आठ दिवसामध्ये १ हजार टन आवक होणार

मदेव मोरे, नवी मुंबई : कांद्याचे गगनाला भिडलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याची आयात सुरू झाली आहे. ईजीप्तवरून तिन कंटेनरमधून ८४ टन कांदा जेएनपीटीमध्ये आला असून शनिवारी तो मुंबईत वितरीत केला जाणार आहे. पुढील आठवड्यात जवळपास १ हजार टन कांद्याची आयात होणार असून त्यामुळे भाव काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यासह पुर्ण देशामध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. सर्वाधीक कांदा उत्पादन होणार्‍या नाशीकमधील होलसेल मार्केटमध्येही कांदा ५० ते ६० रूपये किलो दराने विकला जात आहे. मुंबईमध्येही कांद्याचे दर गगनाला भिडले असून किरकोळ मार्केटमध्ये कांदा ७० ते ८० रूपये किलो दराने विकला जात आहे. कांद्याची आवक प्रचंड घटल्यामुळे शासनाने कांदा आयात करण्यास सुरवात केली आहे. एलीगंडा फुड्स या कंपनीने ईजीप्तचा कांदा दुबईवरून समुद्राच्या मार्गे मागविला होता. गुरूवारी रात्री ३ कंटेनरमधून ८४ टन कांदा जेएनपीटी बंदरामध्ये दाखल झाला आहे. श्री स्वामी समर्थ शिपींग कंपनीने कस्टमचे सर्व सोपस्कर वेगाने पुर्ण करून शुक्रवारी रात्री कांदा जेएनपीटी बंदराबाहेर काढला आहे. कंपनीचे मालक सचीन धुमाळ यांनी सांगितले की शनिवारी ईजीप्तचा कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ईजीप्तवरून ३० ते ४० कंटेनरमधून अजून १ हजार टन पेक्षा जास्त कांदा आयात केला आहे. हा कांदा पुढील आठ दिवसामध्ये जेएनपीटीमध्ये पोहचणार आहे. कांद्याची टंचाई लक्षात घेवून व कांदा नाशीवंत असल्यामुळे शासनाने जेएनपीटी बंदरामध्ये एक दिवसामध्ये सर्व प्रक्रिया पुर्ण करून कांदा मार्केटमध्ये जाईल अशी व्यवस्था केली आहे. यामुळे पुढील आठवड्यात विदेशातील कांद्याची आवक वाढल्यामुळे बाजारभाव कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजूनही इतर देशातून कांदा मागविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ईजीप्तचा कांद्याचा दर्जाही चांगला असल्यामुळे तो ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रतिक्रिया
ईजीप्तवरून एलीगंड्स फुड कंपनीने मागविलेल्या तिन कंटेनरमधून ८४ टन कांदा जेएनपीटीमध्ये गुरूवारी आला आहे. एक दिवसामध्ये सर्व प्रक्रिया पुर्ण करून शुक्रवारी सायंकाळी कांदा बंदराच्या बाहेर काढला असून शनिवारी तो मार्केटमध्ये उपलब्ध होईल.
सचीन धुमाळ
मालक, श्री स्वामी समर्थ शिपींग कंपनी
फोटो
कांदा, नावाने मेल केले आहेत व चिंचपोकळी फोल्डरला पाठवित आहे.

Web Title: 84 tonnes of onion imported from Eighth, imported to prevent inflation: 1 thousand tonnes in arrivals in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.