एक कोटी डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या श्रीमंत भारतीयांची (हाय नेटवर्थ वेल्थ इंडिविज्युअल्स) संख्या २०२४ मध्ये सहा टक्क्यांनी वाढून ८५,६९८ वर पोहोचल्याचं जागतिक रिअल इस्टेट सल्लागार कंपनी नाइट क्रॅकच्या अहवालातून समोर आलं आहे. नाइट फ्रैंकनं बुधवारी आपला 'द वेल्थ रिपोर्ट-२०२५' प्रसिद्ध केला.
२०२३ मध्ये देशातील श्रीमंतांची संख्या ८०,६८६ इतकी होती. २०२८ पर्यंत देशातील श्रीमंतांची संख्या वाढून ९३,७५३ वर पोहोचण्याची शक्यता आहे. यावरून असं दिसून येतंय की भारतामध्ये श्रीमंत व्यक्तींची संख्या वाढत आहे, असं सल्लागार कंपनीनं म्हटलंय.
कोट्यधीशांची संख्या किती ?
२०२३ - ८०,६८६
२०२४ - ८५,६९८
२०२८ - ९३,७५३ (अंदाज)
अब्जाधीशांकडे किती संपत्ती?
नाइट फ्रैंकच्या अहवालानुसार, भारतामध्ये सध्या १९१ अब्जाधीश आहेत. यातील २६ जणांचा समावेश या यादीत मागच्या वर्षातच झाला आहे. २०१९ मध्ये देशातील अब्जाधीशांची संख्या केवळ ७ इतकी होती.
भारतातील सर्व अब्जाधीशांकडे असलेली एकत्रित संपत्ती ९५० अब्ज डॉलर इतकी आहे. अमेरिकेत अब्जाधीशांकडे ५,७०० अब्ज डॉलरची संपत्ती आहे. ही संख्या जगात सर्वाधिक आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या चीनमधील अब्जाधीशांजवळ एकूण संपत्ती १,३४० अब्ज डॉलर इतकी आहे, असं अहवालात नमूद करण्यात आलंय.
कोणत्या देशात सर्वाधिक अब्जाधीश?
अमेरिका - ५,७०० अब्ज डॉलर
चीन - १,३४० अब्ज डॉलर
भारत - ९५० अब्ज डॉलर