- सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तीन चतुर्थांश लोकांना जीवन विमा सर्वाधिक महत्त्वाच्या आर्थिक साधनांपैकी एक वाटतो.- ६१ टक्के लोकांना जीवन विमा त्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि विवाहात उपयोगी ठरेल असं वाटतं.- विविध वयोगटातील पुरुष आणि महिलांना जीवन विम्याबद्दल वाटत असलेलं महत्त्व सारखंच आहे.
मुंबई: भारतीयांचा जीवन विम्याबद्दलचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी लाईफ इन्शुरन्स काऊन्सिलनं देशभरातील ४० शहरांमध्ये सर्वेक्षण केलं. त्यामध्ये १२ हजारपेक्षा अधिक जणांचा सहभाग होता. 'सबसे पहले लाईफ इन्शुरन्स' या मोहिमेचा भाग म्हणून हे सर्वेक्षण करण्यात आलं. लोकांमध्ये जीवन विम्याबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी देशभरातील २४ विमा कंपन्या ही मोहिम चालवत आहेत. जीवन विम्याचं संरक्षण अतिशय कमी असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो.
लोकांमध्ये जागरुकता असल्याचं सर्वेक्षणातून दिसून आलं. जीवन विमा एक महत्त्वाचं आर्थिक साधन असल्याचं सर्वेक्षणामधून अधोरेखित झालं. अनपेक्षित घटनेमध्ये संरक्षण, भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता आणि कुटुंबाची आर्थिक ध्येय संघटित करण्यासाठी भारतीयांना जीवन विमा महत्त्वाचा वाटत असल्याचं मत सर्व्हेत सहभागी झालेल्या बहुतांश लोकांनी व्यक्त केलं. सर्व्हेत सहभागी झालेल्यांपैकी ७१ टक्के जणांकडे आधीच जीवन विमा होता किंवा ते खरेदी करण्यास उत्सुक होते. कोविड-१९ महामारीमुळे जीवन विमा खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र तरीही जीवन विमा खरेदी करण्याचं महत्त्व लोकांना पटावं यासाठी जागरुकता निर्माण करणं गरजेचं आहे. ९१ टक्के लोकांना विमा गरजेचा वाटतो. मात्र त्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांचं प्रमाण ७० टक्के आहे.
पश्चिमी बाजारपेठेच्या निष्कर्षांवरून असं समोर आलं की, मोठ्या प्रमाणात लोकांना जीवन विम्याबद्दल माहितीही आहे आणि ते यात गुंतवणूक करण्यासही उत्सुक आहे. पश्चिमेकडील बाजारपेठेतील ४५ टक्के लोकांना इक्विटी आणि शेअर्सची माहिती असल्यानं त्यांच्या गुंतवणुकीची मानसिकता दिसून आली. ही आकडेवारी अन्य क्षेत्रांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. या ठिकाणी जीवन विम्यामध्ये गुंतवणूक केलेल्यांची संख्याही अधिक दिसून आली. मुंबई, अहमदाबाद, पुणे यासारख्या शहरांमध्ये जीवन विमा असलेल्याची संख्या अधिक आहे. ९२ टक्के लोक जीवन विमा आपल्यासाठी आवश्यक असल्याचं मानतात. हीच बाब ८० टक्के व्यक्तींच्या मित्र आणि कुटुंबीयांना जीवन विम्याची शिफारस करण्याच्या इच्छेमधूनही दिसून आली. तर या तुलनेत देशभरातील हे प्रमाण ७६ टक्के आहे. जीवन विम्यासारख्या दीर्घकालीन बाबतीत शिफारस महत्त्वाची भूमिका बजावते.
"आम्ही प्रामुख्यानं भारतीय ग्राहकांमध्ये जीवन विम्याबाबत समज, जागरुकता आणि माहिती जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केलं आहे, भारतीय कुटुंबातील कमावणारा प्रत्येक सदस्य आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षित आणि आरोग्यदायी भविष्यासाठी जीवन विम्याला प्राधान्य देण्यासंदर्भात खात्री घेण्याचे आमचे ध्येय आहे. काळजी आणि जबाबदारी दोन्ही महत्त्वाच्या आहेत. याचसोबत आम्ही देशवासीयांना शिक्षितही करु इच्छितो, जेणेकरून आम्हाला सर्वोत्तम जीवन विमा सोल्युशन पुरवता येतील," अशी प्रतिक्रिया लाईफ इन्शुरन्स कौन्सिलचे महासचिव एस. एन. भट्टाचार्य यांनी दिली.
सर्वेक्षणातून काय आलं समोर?
- इतर सर्व आर्थिक साधनांच्या तुलनेत वैश्विक स्तरावर जवळपास ९६ टक्के लोकांमध्ये जीवन विम्याबाबत जागरुकता आहे. यात म्युच्युअल फडांमध्ये ६३ टक्के आणि इक्विटी शेअर्समध्ये ३९ टक्के लोकांमध्ये जागरुकता असल्याचं दिसून आलं.
- आर्थिक साधन म्हणून जीवन विम्याचे महत्त्व सर्व वयोगटातील पुरुष आणि महिलांमध्ये बहुतांश प्रमाणात सारखंच आहे.
- तरुणांच्या तुलनेत ३६ वर्षांमध्ये अधिकाधिक व्यक्ती जीवन विमा घेतात.
- निम्मे ग्राहक इन्शुरन्स एजंट्सकडून जीवन विमा घेण्यास पसंती देतात, तर १० पैकी ३ जण बँकांना पसंती देतात.
- विविध ऑफरिंग्स, लाभ आणि प्रीमिअमची तुलना करू शकत असल्यानं तरुण ग्राहक ऑनलाइन पद्धतीनं जीवन विमा पॉलिसी खरेदी करण्याला पसंती देतात.
- आपल्या कुटुंबातील व्यक्तीनं जीवन विमा घेतला आहे आणि त्यांना याबाबत अधिक माहित आहे, असा दावा ४७ टक्के लोकांनी केला आहे.
जीवन विमा दीर्घकालीन आणि महाग असल्याचं सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना वाटतं. हीच दोन कारणं जीवन विमा खरेदी करताना अनेकांसाठी अडचणीची ठरतात. लोकांना जीवन विम्याबद्दल जागरुक करणं हाच केवळ लाईफ इन्शुरन्स काऊन्सिल आणि 'सबसे पहले लाईफ इन्शुरन्स' मोहिमेचा हेतू नाही, तर लोकांच्या मनातील गैरसमज दूर करणं हेदेखील या मोहिमेचं ध्येय आहे. लोकांनी त्यांच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षित, उज्ज्वल भविष्यासाठी जीवन विमा घ्यायला हवा.
सर्वेक्षणाबद्दल अधिक माहिती- हंसा रिसर्चच्या सहयोगानं अहवाल तयार करण्यात आला. - सर्वेक्षणात २५ ते ५५ वयोगटातील ग्राहकांचा समावेश होता. - शहरांमध्ये ८ मेट्रो शहरं, ९ प्रथम श्रेणीतील आणि २३ द्वितीय शहरांचा समावेश होता. - १२ हजाराहून अधिक जणांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला.
जीवन विमा काऊन्सिलबद्दल-''लाईफ इन्शुरन्स काऊन्सिलची स्थापना विमा कायदा १९३८ च्या अंतर्गत येणाऱ्या कलम ६४ सी नुसार झाली. एलआयसी जीवन विमा उद्योगाचा चेहरा आहे. त्यामुळे उद्योगातील अनेक स्टेकहोल्डर्स एकत्र येतात. सगळे लाईफ इन्शुरर विविध उपसमित्यांच्या माध्यमातून उद्योगाच्या विकासासाठी काम करतात. उद्योग क्षेत्राच्या वतीनं लाईफ इन्शुरन्स काऊन्सिल नियामक (आयआरडीएआय), भारत सरकार आणि वैधानिक संस्थांसमोर अधिक प्रयत्न करते."
“To know more about life insurance please visit sabsepehlelifeins.com”