नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) चार कोटींपेक्षा अधिक सदस्यांना चालू आर्थिक वर्षात आपल्या पीएफवर ८.६ टक्क्याने व्याज मिळू शकते. ईपीएफने २०१५-१६ साठी ८.८ टक्के व्याज दिले आहे. त्या वेळी अर्थ मंत्रालयाने ८.७ टक्के व्याज देण्याचे मत व्यक्त केले होते. अर्थमंत्रालयाचे असे मत आहे की, ईपीएफवरील व्याजदर हे अन्य लघु बचत योजनांशी मिळतेजुळते असावेत. कामगार मंत्रालयाने त्याप्रमाणे हे व्याजदर ठरवावेत. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षात व्याजदर ८.६ टक्के ठेवण्याबाबत कामगार मंत्रालय आणि अर्थमंत्रालयात एकवाक्यता आहे. ईपीएफओने चालू आर्थिक वर्षासाठी उत्पन्नाच्या अंदाजावर अद्याप अभ्यास केलेला नाही. ईपीएफओचे केंद्रीय न्यासी बोर्ड (सीबीटी) उत्पन्नाच्या अंदाजावरच व्याजदराचा निर्णय घेते. त्यानंतर अर्थमंत्रालय शिक्कामोर्तब करते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ईपीएफवर यंदा ८.६ टक्के व्याज?
By admin | Published: September 12, 2016 1:07 AM