Lokmat Money > बिझनेस न्यूज > पंतप्रधान राेजगार याेजनेतील ८८ टक्के उद्याेगांना काेराेनाचा फटका, नारायण राणेंची माहिती

पंतप्रधान राेजगार याेजनेतील ८८ टक्के उद्याेगांना काेराेनाचा फटका, नारायण राणेंची माहिती

Business News: महामारीचा पंतप्रधान राेजगार निर्मिती उपक्रमातील ८८ टक्के उद्याेगांवर विपरित परिणाम झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लाेकसभेत दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 09:00 AM2021-07-31T09:00:30+5:302021-07-31T09:01:11+5:30

Business News: महामारीचा पंतप्रधान राेजगार निर्मिती उपक्रमातील ८८ टक्के उद्याेगांवर विपरित परिणाम झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लाेकसभेत दिली.

88 per cent of industries in PM employment scheme hit hard, says Narayan Rane | पंतप्रधान राेजगार याेजनेतील ८८ टक्के उद्याेगांना काेराेनाचा फटका, नारायण राणेंची माहिती

पंतप्रधान राेजगार याेजनेतील ८८ टक्के उद्याेगांना काेराेनाचा फटका, नारायण राणेंची माहिती

नवी दिल्ली : काेराेना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे सूक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्रातील कंपन्यांवर विपरित परिणाम झाला हाेता.  या महामारीचा पंतप्रधान राेजगार निर्मिती उपक्रमातील ८८ टक्के उद्याेगांवर विपरित परिणाम झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लाेकसभेत दिली.
एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात नारायण राणे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय सूक्ष्म उद्याेग आयाेग आणि खादी ग्रामाेद्याेग आयाेगाकडून सर्वेक्षण करण्यात आले हाेते. त्यात पंतप्रधान राेजगार निर्मिती उपक्रमातील उद्याेगांचा आढावा घेण्यात आला. या उपक्रमांना राेख निधी, नव्या ऑर्डर्स, मनुष्यबळ, लाॅजिस्टिक आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण झाल्याचे दिसून आले. बहुतांश उद्याेग महामारीच्या काळात बंद हाेते. त्यामुळे व्यवसाय ठप्प हाेता. परिणामी कर्मचाऱ्यांना पगार देण्यास अडचणी निर्माण झाल्या. जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित उद्याेगांना लाभ झाल्याचे दिसून आले. 

सर्वेक्षणातील निष्कर्ष
- ८८ टक्के उद्याेगांना काेराेना महामारीचा फटका, १२ टक्के उद्याेगांना लाभ
-५७ टक्के उद्याेग महामारीच्या काळात अनेक दिवस बंद हाेते. 
- ५४ टक्के उद्याेगांना पगार देण्यामध्ये अडचणी आल्या.
- बहुतांश उद्याेगांना व्याजमाफी तसेच अतिरिक्त आर्थिक मदतीची गरज व्यक्त केली.

काेराेनानंतर या क्षेत्राच्या मदतीसाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत अनेक याेजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार ५० हजार काेटींचा अतिरिक्त निधी आणि २० हजार काेटी रुपयांचे दुय्यम कर्ज देण्यात येणार आहे. तसेच २०० काेटी रुपयांपर्यंतच्या निविदांमध्ये केवळ स्वदेशी उद्याेगांनाच सहभागी हाेता येणार आहे.

Web Title: 88 per cent of industries in PM employment scheme hit hard, says Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.