Lokmat Money > बिझनेस न्यूज > नव्या जॉबसाठी नोकरदारांची शोधाशोध, ८८ टक्के जण हातातील काम सोडण्याच्या तयारीत

नव्या जॉबसाठी नोकरदारांची शोधाशोध, ८८ टक्के जण हातातील काम सोडण्याच्या तयारीत

यंदाही तब्बल ८८ टक्के नोकरदार सध्या करीत असलेली नोकरी सोडण्याच्या विचारात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 01:22 PM2024-01-18T13:22:19+5:302024-01-18T13:22:41+5:30

यंदाही तब्बल ८८ टक्के नोकरदार सध्या करीत असलेली नोकरी सोडण्याच्या विचारात आहेत.

88% of employees looking for new jobs are ready to leave their current job | नव्या जॉबसाठी नोकरदारांची शोधाशोध, ८८ टक्के जण हातातील काम सोडण्याच्या तयारीत

नव्या जॉबसाठी नोकरदारांची शोधाशोध, ८८ टक्के जण हातातील काम सोडण्याच्या तयारीत

मुंबई : धकाधकीच्या आयुष्यात तीव्र स्पर्धेला तोंड देत आजची तरुणपिढी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर, सुरू होत असलेल्या नव्या कंपन्या, नवे उद्योग आणि परदेशातही करिअर घडविण्याचा पर्याय यामुळे निर्माण झालेल्या संधी तरुणांना खुणावत असतात. त्यामुळे आर्थिक प्रगती साधण्यासाठी तरुण अन्य नोकरीकडे वळतात. 

यंदाही तब्बल ८८ टक्के नोकरदार सध्या करीत असलेली नोकरी सोडण्याच्या विचारात आहेत. लिंक्डइन या पोर्टलच्या वतीने बुधवारी जारी करण्यात आलेल्या एका अहवालातून हे समोर आले आहे. मागील वर्षी हे प्रमाण ४ टक्क्यांनी वाढले आहे. 

किती जणांचा सहभाग? 
या सर्वेक्षणात २४ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२३ या काळात देशभरातील पू्र्णवेळ तसेच अर्धवेळ नोकरी करणाऱ्या १०९७ नोकरदारांची मते जाणून घेतली. यात पुरुष आणि महिला नोकरदारांचाही समावेश आहे. 

जॉब सर्चसाठी एआयचा वापर
नोकरी शोधण्यासाठी एआय आधारित ॲप्सचा वापर वाढला आहे. शिक्षण, आत्मसात केलेली कौशल्ये आणि अनुभवाच्या आधारे तुम्ही कोणते कंपनी किंवा कोणत्या पदासाठी प्रयत्न करावे, आदींबाबत मार्गदर्शन टॅलेंटप्राइस, पायजामा जॉब्स तसेच फोर्टेसारख्या ॲप्सकडून केले जाते.

व्हिडीओ बायोडेटाचे प्रमाण वाढले
नवीन जॉबच्या शोधासाठी कल्पकतेचा वापर होत आहे. बायोडेटामध्ये फोटोसोबत व्हिडीओ रिझ्युमे जोडला जाऊ लागला आहे. 
हे अनिवार्य नसले तरी तुमची माहिती अधिक प्रभावी व्हावी, यासाठी हा फंडा वापरला जाऊ लागला आहे.
जनसंपर्क अधिकारी, न्यूज रिपोर्टर, अँकर, रेडियो जॉकी, अभिनेते, सॉफ्ट स्किल्स  ट्रेनर आदी पदांसाठी अर्ज करताना व्हिडीओ रिझ्युमे सोबत जोडणे फायद्याचे ठरू लागले आहे.

कशासाठी शोधताहेत नवा जॉब?
७९% आपल्याच क्षेत्रात तसेच वेगळ्या प्रकारची जबाबदारी
४२% आव्हानात्मक आर्थिक वातावरण आणि नोकरी-व्यक्तिगत आयुष्य संतुलन
३७% सध्या मिळत असलेल्या वेतनापेक्षा अधिक वेतन

७२% सहभागींनी सांगितले की, त्यांचा नोकरी शोधण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. 

Web Title: 88% of employees looking for new jobs are ready to leave their current job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.