Join us

आठव्या वेतन आयोगात किती असेल Fitment Factor? किती वाढेल सॅलरी? पाहा Pay Level चं पूर्ण स्ट्रक्चर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:36 IST

8th Pay Commission Salary Hike: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक वाट पाहत असलेल्या आठव्या वेतन आयोगाच्या कामाला आता वेग आलाय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात २० ते ३० टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

8th Pay Commission Salary Hike: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक वाट पाहत असलेल्या आठव्या वेतन आयोगाच्या कामाला आता वेग आलाय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात २० ते ३० टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ५० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?

सरकारच्या संकेतांनुसार आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होऊ शकतो. पूर्वीचा सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आला होता आणि साधारणपणे दर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू केला जातो. त्यानुसार जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे.

फिटमेंट फॅक्टर काय असेल?

7th Vs 8th Pay Commission Calculator: सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरविण्यात फिटमेंट फॅक्टर सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो. सातव्या वेतन आयोगात तो २.५७ होता, ज्यामुळे किमान वेतन ७,००० रुपयांवरून १८,००० रुपये झाल. आता आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरवर १.९० किंवा (१.९२), २.०८ आणि २.८६ असे तीन वेगवेगळे अंदाज आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचं नवं वेतन किती असेल, याचा निर्णय घेतला जाणार आहे. जर फिटमेंट फॅक्टर २.८६ असेल तर किमान वेतन १८००० रुपयांवरून ५१,४८० रुपयांपर्यंत जाऊ शकते.

वेतनपातळीसातवा वेतन आयोग(मूळ वेतन)१.९२ फिटमेंटफॅक्टर२.०८ फिटमेंटफॅक्टर२.८६ फिटमेंटफॅक्टर
स्तर ११८,००० रुपये३४,५६० रुपये३७,४४० रुपये५१,४८० रुपये
स्तर २१९,९०० रुपये३८,२०८ रुपये४१,३९२ रुपये५६,९१४ रुपये
स्तर ३२१,७०० रुपये४१,६६४ रुपये४५,१३६ रुपये६२,०६२ रुपये
स्तर ४२५,५०० रुपये४८,९६० रुपये५३,०४० रुपये७२,९३० रुपये
स्तर ५२९,२०० रुपये५६,०६४ रुपये६०,७३६ रुपये८३,५१२ रुपये
स्तर ६३५,४०० रुपये६७,९६८ रुपये७३,६३२ रुपये१,०१,२४४ रुपये
स्तर ७४४,९०० रुपये८६,२०८ रुपये९३,३९२ रुपये१,२८,४१४ रुपये
स्तर ८४७,६०० रुपये९१,३९२ रुपये९९,००८ रुपये१,३६,१३६ रुपये
स्तर ९५३,१०० रुपये१,०१,९५२ रुपये१,१०,४४८ रुपये१,५१,८६६ रुपये
स्तर १०५६,१०० रुपये१,०७,७१२ रुपये१,१६,६८८ रुपये१,६०,४४६ रुपये

महागाई भत्ता शून्य होणार?

प्रत्येक नव्या वेतन आयोगात सुरुवातीला महागाई भत्ता (डीए) पुन्हा लागू केला जातो. सध्या सातव्या वेतन आयोगात महागाई भत्ता ५३ टक्के इतका आहे, मात्र आठव्या वेतन आयोगात तो शून्यावरून रिसेट केला जाईल आणि नंतर हळूहळू त्यात वाढ केली जाईल.

पेन्शनधारकांना किती फायदा?

सध्या किमान पेन्शन ९,००० रुपये प्रति महिना आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचं जास्तीत जास्त पेन्शन ५० टक्के मूळ वेतनाइतकं निश्चित करण्यात आलंय. सध्या जास्तीत जास्त पेन्शन १,२५,००० रुपये प्रति महिना आहे. आठव्या वेतन आयोगात ते ३ लाख रुपयांपर्यंत असू शकते.

आयोगावर सरकारचं काय म्हणणं काय?

आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी त्याच्या शिफारशींवर २०२५ मध्ये निर्णय होऊन २०२६ पासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या आर्थिक विकासात मध्यमवर्गाची महत्त्वाची भूमिका मान्य केली. आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या दिशेनं काम करणाऱ्या मोदी सरकारचं त्यांनी कौतुक केलं.

टॅग्स :सरकार