अकोला : पावसाच्या कमतरतेमुळे खरीप, रब्बी पिकांंना प्रचंड फटका बसला असून, उत्पादन प्रचंड घटल्याने, यावर्षी धान्याचे दर वाढतील, अशी अपेक्षा होती; पंरतु बाजारात दर कमीच आहेत. सोमवारी मात्र तुरीचे दर ९,५०० रुपये प्रतिक्ंिंवटल तर सोयाबीनचे ३,७१० रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत पोहोचले.
यावर्षी खरिपातील जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन घटले आहे. मूग, उडिदाचे पीक पूर्णत: हातचे गेले असून, सोयाबीनचा उतारा एकरी ५० किलो ते एक क्विंटलपर्यंतच आला आहे. मागील पंधरवड्यात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे हेच दर ७ हजार रुपये प्रतिक्ंिवटल होते. प्रतवारी बघून दर ठरले जात असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. सोयाबीनच्या दरात सारखी चढउतार सुरू आहे. मागील आठवड्यात सोयाबीनचे दर ३२०० ते ३५०० रुपये प्रतिक्ंिवटल होते.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतील तुरीची आवक दररोज ३,५०० क्ंिवटलवर येऊन ठेपली असून, सोयबीनची आवक तर १५०० क्ंिवटलच आहे. या भागात तूर व सोयाबीनचे पीक सर्वाधिक घेतले जाते. याच भागात या दोन्ही पिकांची आवक घटली आहे. मूग या पिकाला ६,९०० रुपये प्रतिक्ंिंवटल दर असून, आवक मात्र केवळ ३५ क्ंिवटल आहे.
९,२०० रुपयापर्यंत पोहोचले तुरीचे दर
पावसाच्या कमतरतेमुळे खरीप, रब्बी पिकांंना प्रचंड फटका बसला असून, उत्पादन प्रचंड घटल्याने, यावर्षी धान्याचे दर वाढतील, अशी अपेक्षा होती;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2016 03:06 AM2016-01-22T03:06:55+5:302016-01-22T03:06:55+5:30