लंडन : भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी तब्बल ९ अब्ज पाऊंडांच्या सामंज्यस्य करारावर (एमओयू) स्वाक्षऱ्या केल्या. यापैकी ६ करार ब्रिटनमधील प्रमुख कंपन्यांशी करण्यात आले आहेत. मोबाईल नेटवर्क, सौर उर्जा, आरोग्यसेवा, बँकिंग अशा व्यापक क्षेत्रात हे करार करण्यात आले आहेत. हे प्रमुख करार पुढीलप्रमाणे आहेत-
१ ब्रिटनमधील सौर ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी लाईट सोर्स भारतात २ अब्ज पाऊंडांची गुंतवणूक करणार आहे.२ वोडाफोन १.३ अब्ज पाऊंडांची गुंतवणूक करून भारतातील आपल्या नेटवर्कमध्ये सुधारणा आणि विस्तार करणार आहे. ३ ब्रिटनमधील आणखी एक प्रमुख वीज कंपनी इंटेलिजंट एनर्जीने १.२ अब्ज पाऊंडांचा करार केला आहे. ४ किंग्ज कॉलेज हॉस्पिटल फाऊंडेशन ट्रस्ट आणि इंडो-युके हेल्थकेअर यांच्यात १ अब्ज पाऊंडांचा करार झाला.५ इंडिया बुल्स ६६ दशलक्ष पाऊंडांची गुंतवणूक करील. स्टार्ट-अप बँक ओकनॉर्थमध्ये हा निधी गुंतविण्यात येईल. ६ येस बँक आणि लंडन स्टॉक एक्स्चेंजने ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्समध्ये बाँड आणि इक्विटी जारी करण्यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
पुणे आणि हैदराबादेत नवी तंत्रज्ञान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच नवे डाटा सेंटर आणि पेमेंट बँकेची स्थापनाही वोडाफोनद्वारे केली जाणार आहे.या करारान्वये भारतातील २७,४00 मोबाईल टॉवरांना स्वच्छ ऊर्जा पुरविण्यात येईल. याशिवाय हायड्रोजन इंधन सेलही बसविण्यात येतील.या कराराद्वारे चंदीगडमध्ये एक हॉस्पिटल उभारण्यात येईल. भारत-ब्रिटनच्या सहकार्यातून अशी एकूण ११ रुग्णालये उभारण्यात येतील. ओकनॉर्थ ही ब्रिटीश कंपनी आहे. या सौद्यामुळे इंडिया बुल्सचा समभाग मुंबई शेअर बाजारात तब्बल १0.२ टक्क्यांनी घसरला. आगामी काळात ३00 दशलक्ष पाऊंडांचे ग्रीन बाँड जारी करण्याची त्यांची योजना आहे. या बाँड्सना चांगला प्रतिसाद मिळेल, असे कंपनीला वाटते.
भारत-ब्रिटनमध्ये ९ अब्ज पाऊंडांचे करार
भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी तब्बल ९ अब्ज पाऊंडांच्या सामंज्यस्य करारावर (एमओयू) स्वाक्षऱ्या केल्या. यापैकी ६ करार ब्रिटनमधील प्रमुख कंपन्यांशी करण्यात आले आहेत
By admin | Published: November 14, 2015 01:37 AM2015-11-14T01:37:02+5:302015-11-14T01:37:02+5:30