चेन्नई : कॉग्निजेंट टेक्नॉलॉजीने कंपनीतील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस योजना जाहीर केली आहे. त्यानुसार, नऊ महिन्यांचे वेतन देऊन या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घेता येणार आहे. कंपनीच्या वेतनाच्या खर्चात कपात करण्याचा हा प्रयत्न आहे. कॉग्निजेंट कंपनीने मंगळवारी रात्रीच डी प्लस वर्गवारीतील कर्मचाऱ्यांना मेल पाठवून हा प्रस्ताव दिला आहे. सहा किंवा नऊ महिन्याचे वेतन घेऊन नोकरी सोडण्याबाबत यात विचारणा करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना व्हीआरएसचा प्रस्ताव देण्यात आला आहे त्यात संचालक आणि वरिष्ठ उपाध्यक्ष या वरिष्ठ पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संचालकांना नऊ महिन्यांचे वेतन तर अन्य वरिष्ठ कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांच्या वेतनाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्गवारीत १००० कर्मचारी येतात. कंपनीने गत दोन दशकात मोठी प्रगती केली आहे. पण, अलीकडच्या काळात हा वेग मंदावला आहे. (वृत्तसंस्था)
व्हीआरएससाठी कॉग्निजेंट देणार नऊ महिन्यांचे वेतन
By admin | Published: May 05, 2017 12:42 AM