Join us  

खूशखबर! यंदा सुरू झाल्या ९० हजार कंपन्या, रोजगार वाढणार; महाराष्ट्र सर्वात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 10:52 AM

भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आली असल्याचे कंपन्यांच्या नोंदणीच्या आकडेवारीवरुन समोर येते.

नवी दिल्ली-

भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आली असल्याचे कंपन्यांच्या नोंदणीच्या आकडेवारीवरुन समोर येते. वर्ष २०२२ च्या सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्येच तब्बल ९० हजारापेक्षा अधिक नवीन कंपन्यांनी आपली कॉर्पोरेट मंत्रालयात नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी १४ टक्क्यांनी अधिक आहे. कंपन्यांच्या नवीन नोंदणीत वाढ झाली असली तर बंद होणाऱ्या कंपन्यांची संख्याही दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत चाचली आहे. यावर्षी आतापर्यंत ५९,५६० कंपन्यांना टाळे ठोकण्यात आले आहे. 

२३.६ लाख कंपन्यांची देशात नोंदणी आहे. यातील केवळ १४.८ लाख कंपन्या सुरू आहेत. बाकी बंद. 

७०,४३२ सरकारी तर १४.१ लाख खासगी कंपन्या सध्या देशात आहेत. 

५९,५६० कंपन्या बंद झाल्या यंदा. यात अधिकाअधिक लहान कंपन्यांचा समावेश आहे. 

७,०४१ कंपन्या दिवाळखोर म्हणून घोषीत करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. 

या राज्यांमध्ये सर्वाधिक कंपन्यामहाराष्ट्र- २,८०,०००नवी दिल्ली- २,४०,०००प.बंगाल- १,३३,०००उत्तर प्रदेश- १,११,०००कर्नाटक- १,०१,०००गुजरात- ७९,०००तामिळनाडू- ५१,०००राजस्थान- ४८,०००

टॅग्स :व्यवसायनोकरी