Lokmat Money > बिझनेस न्यूज > सूक्ष्म सिंचनासाठी राज्याला दिले ९२ कोटी

सूक्ष्म सिंचनासाठी राज्याला दिले ९२ कोटी

सूक्ष्म सिंचन योजनेतील २३१ कोटींची थकबाकी शासनाने यंदा विदर्भ वगळून इतर जिल्ह्यांना दिली. सोमवारी आणखी ९२ कोटी रुपये दिले

By admin | Published: September 23, 2015 10:00 PM2015-09-23T22:00:25+5:302015-09-23T22:00:25+5:30

सूक्ष्म सिंचन योजनेतील २३१ कोटींची थकबाकी शासनाने यंदा विदर्भ वगळून इतर जिल्ह्यांना दिली. सोमवारी आणखी ९२ कोटी रुपये दिले

92 crore given to the state for micro irrigation | सूक्ष्म सिंचनासाठी राज्याला दिले ९२ कोटी

सूक्ष्म सिंचनासाठी राज्याला दिले ९२ कोटी

अकोला : सूक्ष्म सिंचन योजनेतील २३१ कोटींची थकबाकी शासनाने यंदा विदर्भ वगळून इतर जिल्ह्यांना दिली. सोमवारी आणखी ९२ कोटी रुपये दिले. विदर्भातील शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान देण्यास शासन टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती नाराजीचा सूर आहे.
शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन अर्थात ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा, यासाठी केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेला केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान उपलब्ध करू न दिले
जाते.
२०१२-१३ पासून या योजनेची विभागणी करण्यात आली असून, विदर्भ सघन सिंचन विकास प्रकल्पांतर्गत विदर्भातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे साहित्य खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करू न दिले जात आहे; परंतु दोन वर्षांपासून विदर्भातील शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Web Title: 92 crore given to the state for micro irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.