मुंबई : माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात कार्यरत बहुसंख्य कर्मचारी घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करत आहेत. मात्र, मुंबईत या क्षेत्रात सक्रिय असलेल्या ९४ टक्के कर्मचाऱ्यांना या संस्कृतीचा कंटाळा आला असून त्यामुळे उत्पादकता घटत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.माहिती-तंत्रज्ञान (आयटी) आणि तंत्रज्ञान सक्षम सेवा (आयटीईएस) यामध्ये ४१ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १६०० कर्मचाऱ्यांशी चर्चा करून नाइट फ्रँक इंडिया या सल्लागार संस्थेने कॉर्पोरेट रिअल इस्टेटवरील ‘वर्क फ्रॉम होम कल्चरचा परिणाम’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातून ही माहिती हाती आली आहे. येथील आयटी कर्मचाºयांना कार्यालयांतून काम करण्याची ओढ लागल्याचे हा अहवाल सांगतो.आयटी कंपन्यांचा कार्यालयांवरील खर्च अर्थात रिअल इस्टेट आॅपरेटिंग कॉस्ट ही उत्पन्नाच्या ३.६ ते ४.७ टक्के असते. त्यात कार्यालयांचे भाडे ०.५ ते दोन टक्के तर उर्वरित खर्च सुविधा आणि संचलनासाठी होतो.तो खर्च तुलनेने नगण्य आहे. त्यामुळे आयटी कंपन्या वर्क फ्रॉम होम आणि कार्यालयातून केले जाणारे काम आणि त्यातून मिळणारी उत्पादक क्षमता यांचा आलेख मांडून पुढील निर्णय घेतील, अशी माहिती नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी दिली.कर्मचाºयांवर नियंत्रण न ठेवता येणे, व्यवसायाचा गुणात्मक दर्जा खालावणे, कर्मचाºयांच्या प्रतिभाशक्तीला वाव न मिळणे, डेटा सुरक्षा, स्पर्धात्मक कामाचा अभाव अशा अनेक आघाड्यांवर विचार करूनच आयटी कंपन्या आपली भूमिका येत्या काळात ठरवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.कर्मचाºयांनी नोंदविलेले फायदे-तोटे60% प्रवास टळल्याने वेळ आणि पैशांची बचत42% कामावर लक्ष केंद्रित करणे अवघड42% कार्यालयातील सोशल लाइफची उणीव64% इंटरनेटचा आवश्यक स्पीड मिळत नाही50% हॉर्डवेअर संबंधांतील अडचणी42% घरात मुले आणि अन्य कामांमुळे व्यत्यय