Join us

नकोशा कॉल्समुळे झालेत ९५ टक्के लोक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 9:32 AM

Mobile Phone Calls: ‘डू नॉट डिस्टर्ब’मध्ये नोंदणी असूनही देशातील ९५ टक्के मोबाइलधारकांना नको असलेले अनाहूत कॉल येतात, असे ऑनलाइन सर्वेक्षण संस्था ‘लोकलसर्कल्स’ने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. यातील ७७ टक्के लाेकांना रोज असे कॉल येतात, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

 नवी दिल्ली : ‘डू नॉट डिस्टर्ब’मध्ये नोंदणी असूनही देशातील ९५ टक्के मोबाइलधारकांना नको असलेले अनाहूत कॉल येतात, असे ऑनलाइन सर्वेक्षण संस्था ‘लोकलसर्कल्स’ने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. यातील ७७ टक्के लाेकांना रोज असे कॉल येतात, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.सर्वेक्षणात म्हटले आहे की, सर्वाधिक अनाहूत कॉल वित्तीय सेवा संस्था आणि रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित आहेत. बहुतांश लोकांनी ट्रायच्या ‘डू नॉट डिस्टर्ब’ (डीएनडी) सेवेसाठी नोंदणी केली आहे. मात्र, डीएनडी नोंदणी असतानाही मागील १२ महिन्यांत आपल्याला अनाहूत कॉल आले, असे ९६ टक्के मोबाइलधारकांनी सांगितले. 

टॅग्स :मोबाइल