मुंबई : नोटाबंदीनंतर चलनातून बाद केलेल्या 99 टक्के नोटा बँकेत जमा झाल्येचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलं आहे. नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच किती पैसा जमा झाला, याची आकडेवारी आज जाहीर केली आहे. नोटाबंदीपूर्वी चलनात असलेल्या 15.44 लाख कोटी रुपयांपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले. तर 1000 च्या जवळपास 99 टक्के नोटा बँकेत परत आल्या, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. आरबीआयने वार्षिक आर्थिक अहवालात ही माहिती दिली आहे. या अहवालात मार्च 2017 पर्यंतची आकडेवारी देण्यात आली आहे.आठ नोव्हेंबर 2016 रेजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजच्या चलनातून ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा तडकाफडकी बाद करुन काळया पैशांवर सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. त्यानंतर 500 आणि 2000 च्या नव्या नोटा चलनात आणल्या. काही दिवसांपूर्वीच 200 रूपयांची नवी नोटही चलनात आली होती. नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बँकेत जमा करण्यात आल्या. ज्याची आकडेवारी आरबीआयने जवळपास दहा महिन्यांनी जाहीर केली आहे.एक हजार रुपयांच्या नोटेमध्ये केवळ 8 हजार 900 कोटी रुपये म्हणजे 8.9 कोटी नोटा बँकेत परतल्या नाही.500 रुपयांच्या जुन्या नोटेमध्ये 7 हजार 100 कोटी रुपये परत आले नाही आणि उर्वरित नोटा बनावट आणि फाटलेल्या होत्या.एकूण 16 हजार कोटी रुपये परत आले नाही. असे आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे.दरम्यान नोटा छपाईचा खर्चही या आर्थिक वर्षात दुप्पट झाल्याची माहिती आरबीआयने दिली. 2016-17 या वर्षात नोटा छपाईचा खर्च 7 हजार 965 कोटी रुपये झाला आहे, जो 2015-16 या वर्षात 3 हजार 421 कोटी रुपये एवढा होता.चलनातून रद्द केलेल्या ९९ टक्के नोटा बदलण्यात आल्या; नोटाबंदी ही काळा पैसा पांढरा करण्यासाठी केली होती का? अशी टीका प्रश्न माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आरबीआय अहवालानंतर केली.जे काळ्या पैशाविरोधात लढले नाहीत अशी मंडळी नोटाबंदीवरुन भ्रम निर्माण करत आहेत. लेसकॅश अर्थव्यवस्था निर्माण करणे, डिजीटायझेशन वाढले पाहिजे यासाठी नोटाबंदी करण्यात आली असे स्पष्टीकरण अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले.
नोटाबंदीनंतर चलनातून बाद केलेल्या 99 टक्के नोटा बँकेत जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 8:53 PM