नवी दिल्ली : भारतात गरीब आणि श्रीमंतांमध्ये वाढलेली दरी आणि असमानता दूर करण्यासाठी देशातील अतिश्रीमंतांकडून २ टक्के कर आणि ३३ टक्के वारसा कर आकारण्याची गरज आहे, असे सल्ला अर्थतज्ज्ञ थाॅमस पिकेटी यांनी एका शाेध निबंधातून दिला आहे.
पिकेटी यांच्या शाेध निबंधात धन वितरणाचे विकेंद्रीकरण व सामाजिक क्षेत्रांत गुंतवणूक वाढविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्घ हाेण्याकरीता श्रीमंतासाठी एका व्यापक कर पॅकेजचा प्रस्ताव ठेवला आहे. ९९.९६ टक्के वयस्कांना कर आकारणीपासून दूर ठेवत माेठ्या करांद्वारे हाेणाऱ्या महसुलात वाढ करायला हवी.
काय आहे प्रस्ताव?
- १० काेटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ संपत्ती असणाऱ्यांवर २ टक्के वार्षिक कर.
- १० काेटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्यांवर ३३ टक्के वारसा कर लावावा.
- २.७३ टक्के जीडीपीमध्ये याेगदान या कराद्वारे मिळेल.
असमानतेत सतत वाढ
वर्ष २०००च्या दशकापासून भारतात असमानता सतत वाढत आहे. गेल्या वर्षी देशातील एक टक्के लाेकसंख्येकडे संपत्ती आणि उत्पन्नाचा वाटा ४०.१ टक्क्यांवर गेला. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे, असे अहवालात म्हटले आहे.