Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताच्या परकीय चलन साठ्यात 3.5 अब्ज डॉलर्सची घट; तिजोरीत आता किती? जाणून घ्या...

भारताच्या परकीय चलन साठ्यात 3.5 अब्ज डॉलर्सची घट; तिजोरीत आता किती? जाणून घ्या...

भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही माहिती दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 10:11 PM2024-08-02T22:11:28+5:302024-08-02T22:12:13+5:30

भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही माहिती दिली.

A $3.5 billion decline in India's foreign exchange reserves; How much in the treasury now? Find out | भारताच्या परकीय चलन साठ्यात 3.5 अब्ज डॉलर्सची घट; तिजोरीत आता किती? जाणून घ्या...

भारताच्या परकीय चलन साठ्यात 3.5 अब्ज डॉलर्सची घट; तिजोरीत आता किती? जाणून घ्या...

Foreign Exchange Reserves : देशाच्या परकीय चलन साठ्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 26 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा $3.471 अब्ज डॉलर्सने घसरुन $667.386 अब्ज डॉलर्सवर आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही माहिती दिली. मागील आठवड्यात, एकूण चलन साठा $ 4.003 अब्जने वाढून $ 670.386 अब्जाचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

FCA $1.17 बिलियनने कमी झाले
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, 26 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्याचा महत्त्वाचा भाग मानल्या जाणारी परकीय चलन संपत्ती $ 1.171 अब्ज डॉलरने घसरुन $ 586.877 अब्ज वर आली आहे. 

सोन्याच्या साठ्यात सुमारे 2.3 अब्ज डॉलरची घट 
रिझव्र्ह बँकेने सांगितले की, गेल्या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य $2.297 अब्जांनी घटून $57.695 अब्ज झाले आहे. स्पेशल ड्रॉइंग राइट्स (एसडीआर) 5 मिलियन डॉलर्सने कमी होऊन 18.202 अब्ज डॉलरवर आले आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील भारताच्या राखीव ठेवी $2 मिलियनने वाढून $4.612 अब्ज झाल्या आहेत.

Web Title: A $3.5 billion decline in India's foreign exchange reserves; How much in the treasury now? Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.