जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतंही यश हे मिळतंच. व्यवसायात कोणती कल्पना तुमचं कधी आणि कसं नशीब बदलेल हे सांगता येत नाही. ही कल्पना योग्य ठरली तर तुमच्या कमाईचे मार्ग आपहूनच उघडतात. शाळेपासून मित्र असलेल्या दोघांना अशीच कल्पना सूचली. पाच सेकंदाच्या या कल्पनेमुळे ते इंग्लंड, अमेरिका आणि जर्मनीसह अनेक देशांमध्ये पोहोचले. प्रसन्ना नटराजन यानं आपला बालपणीचा मित्र श्रेयस राघव याच्यासह एकत्र येत चटणीफायची (Chutneyfy) सुरुवात केली. चटणी विकून कोणी कोट्यवधी कसा कमावू शकतो असा विचार अनेकांच्या मनात येईल. पण या दोन्ही मित्रांनी आव्हान स्वीकारलं आणि ५ सेकंदाच्या चटणीच्या जोरावर आपला व्यवसाय उभा केला. चटणी विकून कमाईप्रसन्ना आणि श्रेयस हे शाळेपासूनच एकमेकांच्या परिचयाचे आहेत. मुलांना शाळेत पाठवण्यापासून, दुपारचं जेवण तयार करणं आणि अनेक कामं करणं महिलांसाठी किती आव्हानात्मक असतं याची त्यांना कल्पना होती. चटणी तयार करून थोडा त्यांच्या कामात हातभार लावावा असा त्यांचा विचार होता. चटणीबाबत दोघांनी काही प्रयोग केले. अनेक फ्लेवर्स आणि निरनिराळ्या प्रकारची चटणी त्यांनी तयार केली. त्यात सातत्यानं काही बदल करत होते. त्यानंतर २०२२ त्यांनी चटणीफायची सुरुवात केली. हे अनोखं नाव वाचून तुम्हाला ही चटणी तयार करणारी कंपनी आहे याची कल्पना आली असेल.काय आहे चटणीफाय?चटणीफाय ही कंपनी अनेक प्रकारच्या चटण्या तयार करते. ताज्या, ऑथेंटिक चटणीच्या जोरावर त्यांनी आपल्या कंपनीची सुरूवात केली. चटणीफाय पॅकेजमध्ये पानी मिसळून तुम्ही पाच सेकंदात चटणी तयार करू शकता. त्यांच्या या चटणीची अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीसारख्या देशांत मोठी मागणी आहे. या देशांमध्ये त्यांच्या प्रोडक्टची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ चटणी विकून प्रसन्न आणि श्रेयस हे महिन्याला ५० लाख रुपये आणि वर्षा ६ कोटींपर्यंतची कमाई करतात. एकाच वर्षात त्यांची कंपनी नफ्यात आली आहे. त्यांच्या कंपनीच्या प्रोडक्ट्सची विक्री अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, जर्मनीसारख्या देशांमध्ये अधिक आहे. नुकतीच सुरुवात झाली असली तरी कंपनीनं बाजारात आपली स्थितीत मजबूत केली आहे. सध्या कंपनी जाहिरातींवर अधिक खर्च करत नाही. परंतु चटणी विकून कोट्यवधींची कमाई केली जाऊ शकते याची कल्पनाही आधी कोणाला आली नसेल.
हिट ठरली ५ सेकंदांची आयडिया, चटणी विकून मित्रांनी उभी केली कोट्यवधींची कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 10:34 AM