Lokmat Money > बिझनेस न्यूज > मध्यमवर्ग, लहान मुलांना कोरोनाचा मोठा फटका

मध्यमवर्ग, लहान मुलांना कोरोनाचा मोठा फटका

अर्थव्यवस्थेवरील काळे डाग पुसा : राजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 06:34 AM2022-01-24T06:34:14+5:302022-01-24T06:35:15+5:30

अर्थव्यवस्थेवरील काळे डाग पुसा : राजन

A big blow to the middle class, little kids, says raghuram rajan | मध्यमवर्ग, लहान मुलांना कोरोनाचा मोठा फटका

मध्यमवर्ग, लहान मुलांना कोरोनाचा मोठा फटका

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेवर सध्या अनेक काळे डाग लागले आहेत. ते पुसण्यासाठी सरकारने खर्च कमी करत वित्तीय तूट रोखण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. 

कोरोना साथीनंतर लहान व्यवसाय आणि उद्योगांपेक्षा मोठ्या भांडवली कंपन्या जलद सुधारणा करतात. मात्र मला सर्वात जास्त चिंता आहे ती मध्यमवर्ग, लहान आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि मुलांबद्दल. या सर्वांना या महामारीचा सर्वात मोठा फटका बसला आहे, असे रघुराम राजन म्हणाले.
देशाची वित्तीय तुटीची स्थिती चांगली नसल्यामुळे अर्थमंत्री सध्या मोकळ्या हाताने निधी देऊ शकत नाहीत. जगभरात महागाई चिंतेचा विषय असून, भारतालाही त्याचे मोठे फटके बसत असल्याचे ते म्हणाले.

हे आहेत काळे डाग
बेरोजगारी, सामान्यांची खरेदी करण्याची कमी झालेली क्षमता,  लहान कंपन्यांवरील आर्थिक दबाव, कर्जाची अतिशय हळुवार वाढ, शाळेतील शिक्षण हे अर्थव्यवस्थेवरील काळे डाग असल्याचे राजन म्हणाले.

Web Title: A big blow to the middle class, little kids, says raghuram rajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.