Railway Company Share Hike : रेल विकास निगम लिमिटेडचे शेअर्स रॉकेट बनले आहेत. शुक्रवारी रेल विकास निगमचा शेअर ७ टक्क्यांनी वधारून ४५२ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं उच्चांकी स्तर गाठला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एका व्यवहारानंतर झाली. रेल विकास निगम लिमिटेडनं दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत (डीएमआरसी) सामंजस्य करार केला आहे. हा सामंजस्य करार भारत आणि परदेशातील आगामी प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी आहे. ही कंपनी मेट्रो, रेल्वे, हाय स्पीड रेल्वे, महामार्ग, मेगा ब्रिज, बोगदे, संस्थात्मक इमारती, कार्यशाळा किंवा डेपो आणि रेल्वे विद्युतीकरणासाठी प्रकल्प सेवा प्रदाता म्हणून सहभागी होण्याची शक्यता आहे.
वर्षभरात २६३ टक्क्यांची वाढ
गेल्या वर्षभरात रेल विकास निगम लिमिटेडच्या (आरव्हीएनएल) शेअरमध्ये २६३ टक्क्यांची वाढ झाली आहे. ५ जुलै २०२३ रोजी रेल्वे कंपनीचा शेअर १२४.१० रुपयांवर होता. ५ जुलै २०२४ रोजी रेल विकास निगमचा शेअर ४५२ रुपयांवर पोहोचला. गेल्या सहा महिन्यांत रेल विकास निगम लिमिटेडचे शेअर्स १४५ टक्क्यांनी वधारले. कंपनीचे शेअर्स ६ महिन्यांत १८४ रुपयांवरून ४५० रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ११७.०५ रुपये आहे.
वर्षभरात १४०० टक्क्यांची वाढ
गेल्या दोन वर्षांत रेल्वे विकास निगम लिमिटेडचे (आरव्हीएनएल) शेअर्स १४०० टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. १ जुलै २०२२ रोजी रेल्वे कंपनीचा शेअर ३० रुपयांवर होता. ५ जुलै २०२४ रोजी कंपनीचा शेअर ४५२ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ३ महिन्यांत रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्समध्ये ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ५ एप्रिल २०२४ रोजी कंपनीचा शेअर २६४.१० रुपयांवर होता. त्यानंतर ५ जुलै २०२४ रोजी रेल्वे कंपनीचा शेअर ४५२ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या महिनाभरात रेल विकास निगम लिमिटेडच्या (आरव्हीएनएल) शेअरमध्ये २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)