कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (QIA) मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये 95 कोटी ते एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी यासंदर्भात सांगता या डीलबाबत क्युआयए आणि रिलायन्स रिटेल यांच्यात पुढील फेरीची चर्चा सुरू असल्याचं म्हटलं. कतार स्थित हा सॉवरेन फंड रिलायन्स रिटेलमध्ये सुमारे 100 अब्ज डॉलर्सच्या व्हॅल्यूएशनसह गुंतवणूक करू शकतो. या रिपोर्टमुळे बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये (RIL Share Price) मोठी उसळी दिसून आली.
कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत जवळपास दुप्पट मूल्यांकनासह गुंतवणूक करत आहे. सौदी अरेबियाच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडानं 2020 मध्ये रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडमध्ये 1.3 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह 2.04 टक्के भागभांडवल विकत घेतलं. सुमारे 62.4 अब्ज डॉलरच्या व्हॅल्युएशननुसार हा करार करण्यात आला.
रिलायन्स रिटेलमध्ये क्युआयएच्या गुंतवणूकीचा रिपोर्ट समोर आल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर बुधवारी बीएसईवर कामकाजाच्या अखेरच्या सत्रात 2.51 टक्क्यांनी वाढून 2,526 रुपयांवर पोहोचला. फायनान्शियल सर्व्हिसेस बिझनेसच्या डिमर्जरच्या एक्स डेटपासून या शेअरमध्ये सातत्यानं घसरण होत होती.
मार्केट कॅप वाढलं
रिलायन्सच्या शेअर्सच्या वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅप पुन्हा 17 लाख कोटींच्या पुढे गेलं. सध्या कंपनीचं मूल्यांकन 17,14,372.90 कोटी रुपये आहे. तसे, मंगळवारचं क्लोजिंग 16,78,006.23 कोटी रुपयांपासून आजच्या ट्रेडिंग सत्रापर्यंत, कंपनीचे MCAP 17,23,439.12 कोटींवर पोहोचले होते. याचा अर्थ कंपनीच्या एमकॅपमध्ये 45,432.89 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.