सोने आणि चांदीच्या दरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली चढ-उतार सोमवारीही बघायला मिळाली. सराफा बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्सचेन्जवरही (MCX) सोमवारी सोन्या चांदीच्या दरार चढ-उतार बघायला मिळाली. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीच्या तरात तेजी दिसून आली आहे. 5 मे रोजी 61739 रुपयांच्या विक्रमी दरावर पोहोचलेले सोने आता घसरणीसह 60,000 च्याही खाली आले आहे. हेच हाल चांदीचेही आहेत. चांदी 77280 रुपयांवरून घसरून 72,000 रुपयांच्या जवळपास विकली जात आहे.
मे महिन्यानंतर, आतापर्यंत सोन्याचा दर 2000 रुपये प्रति 10 ग्रॅमहून अधिक, तर चांदीचा दर 5000 रुपयांहून अधिक घसरला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेन्जवर (MCX) सोन्याच्या दरात घसरण आणि चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे, येणाऱ्या काळात सोन्याचा दर वाढून 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी वाढून 80,000 रुपये प्रति किलोवर पोहोचू शकते.
MCX वर सोन्या-चांदीच्या दरात तेजी -
मल्टी-कमोडिटी एक्सचेन्जवर (MCX) सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात संमिश्रता दिसून येत आहे. MCX वर सोने 9 रुपयांच्या घसरणीसह 59345 रुपये प्रति 10 ग्रॅमवर, तर चांदी 142 रुपयांच्या उसळीसह 72830 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
सराफा बाजारात सोन्याचा दर -
सराफा बाजारातील दर https://ibjarates.com पर जारी केला जातो. येथे सोमवारी 24 कॅरेट सोने घसरणीसह 59370 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 72626 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. चांदीत 200 हून अधिकची तेजी आणि सोन्याच्या दरात 200 रुपयांहून अधिकची घसरण दिसून आली आहे. यापूर्वी शुक्रवारी सोन्याचा दर 59582 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 72420 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.