Join us

वयाच्या केवळ 34 व्या वर्षी TATA समूहात मोठं पाऊल; रतन टाटांसोबत आहे खास नातं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 10:24 AM

माया टाटा केवळ 34 वर्षांच्यां आहेत. महत्वाचे म्हणजे, त्या माध्यमांमध्ये फारशी दिसत नाही.

टाटा कुटुंबातील आणखी एका व्यक्तीने आता टाटा समूहात पाय ठेवला आहे. या व्यक्तीचे नाव आहे माया टाटा. माया टाटा केवळ 34 वर्षांच्यां आहेत. महत्वाचे म्हणजे, त्या माध्यमांमध्ये फारशी दिसत नाही. माया टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांची सावत्र पुतणी आहे. त्यांना नुकतेच टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या बोर्डात सामील करण्यात आले आहे. 29 ऑगस्‍तला टाटा सन्सची एजीएम आहे, यात त्यांच्या भूमिकेसंदर्भात काही मोठा निर्णय होऊ शकतो.

रतन टाटा यांच्यासोबत नाते -माया टाटा या रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा आणि अलू मिस्त्री यांची मुलगी आहे. अलू या अब्जाधीश पालोनजी मिस्त्री यांच्या कन्या आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची बहीण आहे. सायरस यांच्या दुर्दैवाने एका कार अपघातात मृत्यू झाला होता. मिस्त्री कुटुंबाचा दीर्घ काळापासूनच सायरस इंव्हेस्टमेंट्स प्रायव्हेट आणि स्टर्लिंग इंव्हेस्टमेंट ग्रुपच्या माध्यमाने टाटाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समधील जवळपास 18.4 टक्के वाटा आहे. अशा प्रकारे माया यांचे टाटांसोबत दुहेरी नाते आहे.

माया यांचे शिक्षण -माया यांनी ब्रिटनचे बेयस बिझनेस स्कूल आणि वारविक विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्या नवल टाटा आणि त्यांची दुसरी पत्नी सिमोन टाटा यांची नात आहे. सोमन नोएल टाटा यांची आई आणि रतन टाटा यांची सावत्र आई आहे. माया यांनी टाटा कॅपिटलची सहकारी कंपनी असलेल्या टाटा अपॉर्च्युनिटीज फंडपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. माया यांनी फंडमधील कॉर्पोरेट जगतातील जटिल डायनॅमिक्‍स समजून घेताना पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार संबंधांसंदर्भातील आपले कौशल्य आणखी चांगले केले. 

करियरमध्ये ट्विट्स -टाटा अपॉर्चुनिटीज फंड बंद झाल्याने माया यांच्या करिअरची दिशा बदलली. यानंतर त्या टाटा समूहाची सहायक कंपनी असलेल्या टाटा डिजिटलसोबत जोडल्या गेल्या. या कंपनीचा फोकस डिजिटल क्षेत्रात नव नव्या शक्यतांचा शोध घेणे असा आहे. माया यांच्याकडून समूहाला मोठ्या अपेक्षा आहेत.

टॅग्स :टाटारतन टाटाव्यवसाय