DGCA Fine on Air India : टाटा समूहाची विमान कंपनी Air India ला मोठा झटका बसला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियावर पुन्हा एकदा मोठा आर्थिक दंड ठोठाला आहे. नॉन-क्वालिफाइड क्रू मेंबर्सना घेऊन उड्डाण केल्यामुळे एअर इंडियावर तब्बल 98 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय डीजीसीएने एअर इंडियाच्या डायरेक्टर ऑपरेशन्सला 6 लाख रुपये आणि डायरेक्टर ट्रेनिंगला 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नियमांचे उल्लंघन उघड झाले
डीजीसीएने सांगितले की, एअर इंडियाने नॉन-ट्रेनर लाइन कॅप्टन आणि नॉन-रिलीझ फर्स्ट ऑफिसरसह उड्डाण केले. यानंतर कंपनीने स्वेच्छेने नोंदवलेल्या या घटनेनंतर DGCA ने एअरलाइनच्या ऑपरेशन्सची व्यापक तपासणी केली, ज्यामध्ये अनेक नियामक उल्लंघने केल्याचे आढळले.
DGCA च्या नोटीसला समाधानकारक प्रतिसाद नाही
DGCA ने सांगितले की, तपासाच्या आधारावर एअर इंडियाच्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियामक तरतुदींमध्ये त्रुटी आणि उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. 22 जुलै 2024 रोजी DGCA ने एअर इंडियाच्या फ्लाइट कमांडर आणि इतर पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर दिलेले उत्तर असमाधानकारक मानले गेले नाही, म्हणूनच DGCA ने नियमांनुसार कारवाई करण्याचा आणि दंड आकारण्याचा निर्णय घेतला.
एअर इंडियाची मोठी ऑफर; फक्त रु. 1700 मध्ये करा विमान प्रवास, जाणून घ्या डिटेल्स...
मार्चमध्ये एअर इंडियाला 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता
याआधी मार्चमध्ये डीजीसीएने पायलट विश्रांती कालावधीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एअर इंडियाला 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.