Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI कडून लोन घेणाऱ्यांना मोठा झटका, आजपासून लागू झाला नवा नियम; 31 डिसेंबरपर्यंत होम लोनवर सूट

SBI कडून लोन घेणाऱ्यांना मोठा झटका, आजपासून लागू झाला नवा नियम; 31 डिसेंबरपर्यंत होम लोनवर सूट

एसबीआयने बेस रेट 10.10% ने वाढवून 10.25% केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 03:11 PM2023-12-15T15:11:23+5:302023-12-15T15:12:15+5:30

एसबीआयने बेस रेट 10.10% ने वाढवून 10.25% केला आहे.

A blow to the borrowers from SBI, the new rule came into force from today sbi hikes base rate by 15 bps and loan interest rates up by 10 basis point | SBI कडून लोन घेणाऱ्यांना मोठा झटका, आजपासून लागू झाला नवा नियम; 31 डिसेंबरपर्यंत होम लोनवर सूट

SBI कडून लोन घेणाऱ्यांना मोठा झटका, आजपासून लागू झाला नवा नियम; 31 डिसेंबरपर्यंत होम लोनवर सूट

जर आपण एसबीआय कडून लोन घेतले असेल अथवा लोन घेण्याचे नियोजित असेल तर, ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. हो, देशातील सर्वात मोठ्या पब्‍ल‍िक सेक्‍टर बँकेने अर्थात एसबीआयने एमसीएलआर (MCLR) आणि बेस रेटमध्ये वाढ केली आहे. हे नवे दर बँकेकडून 15 डिसेंबर, 2023 पासून लागू केले जाणार आहेत. एसबीआयच्या वेबसाइटवरही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. एमसीएलआर हा एक असा किमान व्याज दर, ज्यानुसार बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देऊ शकते. एसबीआयने बेस रेट 10.10% ने वाढवून 10.25% केला आहे.

तीन वर्षांचा MCLR 10 बेसिस पॉइंटने वाढला -
एसबीआयचा डिसेंबर 2023 साठीचा एमसीएलआर दर 8% आणि 8.85% दरम्यान होता. ओव्हरनाइट एमसीएलआर दर 8% निर्धारित करण्यात आला आहे. एक महिना आणि तीन महिन्यासाठी एमसीएलआर दर 8.15% वरून 8.20% करण्यात आला आहे. सहा महिन्यांचा एमसीएलआर 10 बीपीएसने वाढून 8.55% झाला आहे. ग्राहकांच्या लोनशी संबंधित एका वर्षाचा एमसीएलआर 8.55% वरून 10 बीपीएसने वाढवून 8.65% करण्यात आला आहे. दोन वर्ष आणि तीन वर्षांच्या एमसीएलआरमध्येही 10 बेस‍िस प्‍वाइंटची वाढ झाली आहे. तो वाढून आता 8.75% आणि 8.85% झाला आहे.

याशिवाय, बीपीएलआरमध्येही 15 बेस‍िस प्‍वाइंटची वाढ करण्यात आली असून तो वाढवून 15 टक्के करण्यात आला आहे. हा बदलही 15 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहे. एसबीआयने नुकतेच होम लोनवरील व्याजदरात 65 बेस‍िस प्‍वाइंटपर्यंतची घट करून स्‍पेशल फेस्‍ट‍िव्ह सीझन ऑफर दिली होती. ही ऑफर 31 डिसेंबर, 2023 पर्यंत व्हॅलीड असेल. बँकेकडून होमलोन 8.4% दराने दिले जात आहे. याशिवाय, ग्राहकांना SBI टॉप-अप हाउस लोनवर 8.9% सवलतीचा दर देखील मिळू शकतो. अर्थात 1 जानेवारीपासून आपल्याला गृहकर्जासाठी अधिक व्याज द्यावे लागणार आहे.
 

Web Title: A blow to the borrowers from SBI, the new rule came into force from today sbi hikes base rate by 15 bps and loan interest rates up by 10 basis point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.