Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'बिग बी' अमिताभ बच्चन यांचा शेजारी व्हायची संधी; पाहा किती पैसे मोजावे लागणार?

'बिग बी' अमिताभ बच्चन यांचा शेजारी व्हायची संधी; पाहा किती पैसे मोजावे लागणार?

बिग बी यांच्या बंगल्या शेजारी असलेल्या या बंगल्याचा कार्पेट एरिया १,१६४ स्क्वेअर फूट आहे. तर २,१७५ स्क्वेअर फुटांची ओपन स्पेसही आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 08:46 AM2024-03-13T08:46:28+5:302024-03-13T08:48:51+5:30

बिग बी यांच्या बंगल्या शेजारी असलेल्या या बंगल्याचा कार्पेट एरिया १,१६४ स्क्वेअर फूट आहे. तर २,१७५ स्क्वेअर फुटांची ओपन स्पेसही आहे.

A chance to be next door to bollywood superstar Big B Amitabh Bachchan See how much money you have to pay | 'बिग बी' अमिताभ बच्चन यांचा शेजारी व्हायची संधी; पाहा किती पैसे मोजावे लागणार?

'बिग बी' अमिताभ बच्चन यांचा शेजारी व्हायची संधी; पाहा किती पैसे मोजावे लागणार?

बॉलिवूडचे सुपरस्टार 'बिग बी' अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) यांच्या मुंबईतील 'जलसा' या बंगल्याशेजारी असलेल्या बंगल्याचा लिलाव होणार आहे. डॉईशे बँकेनं  (Deutsche Bank)  हा बंगला लिलावासाठी ठेवला असून त्याची रिझर्व्ह प्राईझ २५ कोटी रुपये आहे . या बंगल्याचा कार्पेट एरिया १,१६४ स्क्वेअर फूट आहे, इतकंच नाही तर या बंगल्यात २,१७५ स्क्वेअर फुटांची ओपन स्पेसही आहे. डॉईशे बँकेनं जारी केलेल्या पब्लिक नोटीसनुसार, हा लिलाव २७ मार्च रोजी होणार आहे.

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट (SARFAESI) अंतर्गत या बंगल्याचा लिलाव केला जात आहे. पब्लिक नोटीसनुसार, बँकेनं एप्रिल २०२२ मध्ये डिमांड नोटीस पाठवली होती, ज्यामध्ये त्यांनी कर्जदार सेव्हन स्टार सॅटेलाइट प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांना ६० दिवसांच्या आत १२.८९ कोटी रुपयांची थकबाकी भरण्यास सांगितलं होतं.

बॉरोअर आणि को-बॉरोअर ही रक्कम भरण्यात अयशस्वी ठरल्यामुळे, बँकेनं त्यांच्याकडे गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. या मालमत्तेचा लिलाव २७ मार्च रोजी होणार असून त्याची राखीव किंमत २५ कोटी रुपये आहे, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय. याबाबत सेव्हन स्टार सॅटेलाइट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक अतुल सराफ यांना विचारलं असता, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यानं त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला.

लिलावाद्वारे प्रॉपर्टी खरेदी करावी का?
रिअल इस्टेट एक्सपर्ट्सच्या मते, बँका सहसा सवलतीच्या किमतीत मालमत्ता विकतात, त्यामुळे संभाव्य खरेदीदारांना तुलनेने स्वस्त किमतीत मालमत्ता मिळू शकते. "कर्जाची रक्कम फेडायचे चुकल्यास, जप्त केलेल्या अनेक प्रकारच्या मालमत्तांची विक्री बँकांना करावी लागते. अशा मालमत्ता साधारणपणे १५ ते ३० टक्के सवलतीत विकल्या जातात. सध्याचं प्रकरणही पाहिलं तर 'जुहू बीच'वरील मालमत्तेची किंमत ३५ ते ४० कोटी रुपये आहे," अशी प्रतिक्रिया लिलावातील प्रॉपर्टीच्या व्यवसायात सहभागी असलेल्या हेक्टा या मार्केटिंग प्लॅटफॉर्मचे संस्थापक श्रीधर समुद्रला यांनी दिली.

Web Title: A chance to be next door to bollywood superstar Big B Amitabh Bachchan See how much money you have to pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.