Lokmat Money > बिझनेस न्यूज > अदानींचा जवळचा 'पाहुणा'च SEBI च्या समितीवर, खासदाराने उपस्थित केला प्रश्न

अदानींचा जवळचा 'पाहुणा'च SEBI च्या समितीवर, खासदाराने उपस्थित केला प्रश्न

उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्तीलाही मोठा धक्का बसला आहे. अदानींची संपत्ती निम्म्यावर आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 07:23 PM2023-02-03T19:23:25+5:302023-02-03T19:37:15+5:30

उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्तीलाही मोठा धक्का बसला आहे. अदानींची संपत्ती निम्म्यावर आली आहे

A close guest of Gautam Adani on SEBI's committee, the MP Mahua moitra raised the question | अदानींचा जवळचा 'पाहुणा'च SEBI च्या समितीवर, खासदाराने उपस्थित केला प्रश्न

अदानींचा जवळचा 'पाहुणा'च SEBI च्या समितीवर, खासदाराने उपस्थित केला प्रश्न

उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होताना दिसत आहे. यावर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, अदानी समूहाच्या प्रकरणाशी सरकारचा काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. हिंडेनबर्ग या अमेरिकन संस्थेच्या अहवालानंतर अदानी एंटरप्रायझेससह समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने घसरत आहेत. आता, याप्रकरणी तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विट करुन अदानी यांचा पाहुणाचा SEBI च्या समितीवर असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, या वकिल महोदयांबद्दल आपणास प्रचंड आदर आहे, असेही त्यांनी म्हटले.  

उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्तीलाही मोठा धक्का बसला आहे. अदानींची संपत्ती निम्म्यावर आली आहे. अशा स्थितीत या संकटाचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून संसदेतही गदारोळ झाला. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष सभागृहात अदानी समूहाच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत आहेत. त्यातच, सेबीच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावरुनच, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विट करुन SEBI च्या समितीत गौतम अदानींचे वकील व्याही असल्याचे म्हटले. 

दिग्गज वकील सिरील श्रॉफ यांचा मी आदर करते. मात्र, त्यांच्या मुलीचा विवाह गौतम अदानींच्या मुलासोबत झाला आहे. श्रॉफ हे सध्या कॉर्पोरेट गर्व्हर्नेंस अॅण्ड इनसायडर ट्रेंडिग बाबतच्या SEBI च्या समितीवर आहेत. जर, सेबी अदानी प्रकरणाची चौकशी करत असेल तर श्रॉफ यांनी सेबीच्या त्या समितीवरून तात्काळपणे पायउतार झाले पाहिजे, असेही मोइत्रा यांनी म्हटले. त्यामुळे, सेबीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.  

सरकारतर्फे प्रल्हाद जोशींचे उत्तर

अदानी समूहाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका काय? असे विचारले असता मोदी सरकारचे मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, 'अदानी समूहाच्या प्रकरणाशी सरकारचा काहीही संबंध नाही. विरोधकांकडे दुसरा कुठल्ही मुद्दा नाही. यामुळे ते हा मुद्दा उपस्थित करत आहेत. अदानी प्रकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून संसदेत गदारोळ सुरू आहे. काँग्रेस, शिवसेना, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसीसह अनेक विरोधी पक्षांनी शुक्रवारीही कामकाज सुरू होताच गदारोळ सुरू केला. यामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.

गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत 'टॉप-२०'मधूनही गेले बाहेर 

Bloomberg Billionaires Index च्या माहितीनुसार गौतम अदानींच्या नेटवर्थमध्ये झालेल्या पडझडीमुळे ते आता श्रीमंतांच्या यादीत थेट २१ व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांची एकूण संपत्ती आता ६१.३ अब्ज डॉलर इतकी झाली आहे आणि गेल्या २४ तासात त्यांना १०.७ अब्ज डॉलरचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेअर्समधील घट पाहता गौतम अदानी आता फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गपेक्षाही मागे गेले आहेत. झुकरबर्गची एकूण संपत्ती ६९.८ अब्ज डॉलर इतकी आहे आणि तो श्रीमंतांच्या यादीत १२ व्या स्थानावर आहे. 
 

Web Title: A close guest of Gautam Adani on SEBI's committee, the MP Mahua moitra raised the question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.