Join us  

निवडणुकीपूर्वी बँकांसाठी पाच दिवसांचा आठवडा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 2:54 PM

५ दिवसांच्या आठवड्याचा नियम १८० दिवसांच्या आत लागू करण्यात यावा, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनांनी केली होती.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी बँक कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे. हा नियम झाल्यास बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यात फक्त ५ दिवस काम करावे लागेल.  

सूत्रांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी यासंबंधीचा निर्णय घेण्याची तयारी मोदी सरकारने चालविली आहे. ५ दिवसांच्या आठवड्याचा नियम १८० दिवसांच्या आत लागू करण्यात यावा, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनांनी केली होती.

टॅग्स :बँकसरकार