Join us

चीनच्या अडचणीत आणखी वाढ! रिअल इस्टेटपाठोपाठ ईव्ही उद्योगही तोट्यात, G-20 नंतर आफ्रिकेने दिला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 4:16 PM

चीनच्या अर्थव्यवस्थे संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

चीन गेल्या काही महिन्यापासून अडचणीत सापडला आहे. अगोदर रिअल इस्टेट व्यवसाय अडचणीत आला, आता चीनमधील इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगही अडचणीत सापडला आहे.  चीन आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणात लिथियमसारखा धातू काढत होता, आता यावर बंधने आली आहेत. यामुळे चीनच्या इलेक्ट्रीक वाहन व्यवसाय अडचणीत सापडणार आहे. 

"मोहम्मद सिराजला एक SUV कार द्या"; चाहत्याला ट्विटला महिंद्रांचा क्वीक रिप्लाय

हा धातू इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. पण आता आफ्रिकन देशांनी चीनला खाण ​​क्षेत्रातून वगळण्यास सुरुवात केली आहे. आफ्रिकेतील संसाधने लुटल्याचा आरोप चिनी कंपन्यांवर होत आहे. आफ्रिकेतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या नायजेरियाने ऑगस्टमध्ये चिनी कंपन्यांच्या अवैध खाणकामावर बंदी घातली होती. चिनी कंपन्या तिथे टायटॅनियम काढत होत्या. यापूर्वी नामिबियानेही एका चिनी कंपनीचा परवाना रद्द केला होता. ही कंपनी अवैधरित्या लिथियम काढत होती.

त्याचप्रमाणे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोने दक्षिण किवू येथील सहा चिनी कंपन्यांवर बंदी घातली आहे. या कंपन्यांवर सोने आणि इतर खनिजे अवैधरित्या काढल्याचा आरोप आहे. काही दिवसापूर्वी देशात एका हल्ल्यात दोन चिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. अलीकडच्या काळात आफ्रिकेत चिनी नागरिकांवर हल्ले होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या वर्षी मार्चमध्ये मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये झालेल्या हल्ल्यात नऊ चिनी लोकांचा मृत्यू झाला होता. आ

फ्रिकेतून येणारा बहुतांश धातू चीनमध्ये जातो. २०१९ मध्ये, उप-सहारा देशांमधून चीनला १०  अब्ज डॉलर किमतीची खनिजे निर्यात करण्यात आली.

यूके एनजीओ राइट्स अँड अकाउंटेबिलिटी इन डेव्हलपमेंटच्या मते, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो सारख्या देशांमध्ये ४०,००० हून अधिक मुले चीनी खाण कंपन्यांमध्ये काम करतात. DRC हा आकाराच्या दृष्टीने आफ्रिकेतील दुसरा सर्वात मोठा देश आहे. या देशात अनेक चिनी कंपन्या कार्यरत आहेत. देशातील एकूण १९ कंपन्या कोबाल्ट उत्खननात आहेत. यापैकी १५ मध्ये चिनी कंपन्यांची हिस्सेदारी आहे. चिनी बँकांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज दिले आहे. २०२१ मध्ये, चिनी कंपनी शियांग जियांगला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ९०,००० डॉलरचा दंड ठोठावण्यात आला.

२०१९ मध्ये, बेकायदेशीर सोन्याच्या खाणकामाच्या आरोपाखाली घानामध्ये ३३ चीनी नागरिकांना अटक करण्यात आली होती. घाना हा आफ्रिकेतील सोन्याचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. या देशात सुमारे ३०,००० चीनी वंशाचे लोक राहतात जे व्यवसाय, खाणकाम आणि पायाभूत प्रकल्पांमध्ये आहेत. २०१७ मध्ये झांबियामध्ये बेकायदेशीर खाणकाम केल्याप्रकरणी ३१ चिनी नागरिकांना अटक करण्यात आली होती. देशात सुमारे २२,००० चीनी वंशाचे लोक राहतात. २८० चिनी कंपन्या तिथे काम करत आहेत. 

टॅग्स :चीनजी-२० शिखर परिषद