Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' गुंतवणुकीचा सोन्यासारखा परतावा; भावही वाढला, व्याजही मिळणार!

'या' गुंतवणुकीचा सोन्यासारखा परतावा; भावही वाढला, व्याजही मिळणार!

आठ वर्षांच्या रोख्यांनी तब्बल १३.६३ टक्के दराने परतावा दिला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 11:28 AM2023-11-10T11:28:49+5:302023-11-10T11:28:59+5:30

आठ वर्षांच्या रोख्यांनी तब्बल १३.६३ टक्के दराने परतावा दिला आहे. 

A golden return on 'this' investment; The price has also increased, interest will also be received! | 'या' गुंतवणुकीचा सोन्यासारखा परतावा; भावही वाढला, व्याजही मिळणार!

'या' गुंतवणुकीचा सोन्यासारखा परतावा; भावही वाढला, व्याजही मिळणार!

नवी दिल्ली : सार्वभौम सुवर्ण रोख्यांचा (सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड) पहिला परिपक्वता अवधी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण होत आहे. आठ वर्षांच्या रोख्यांनी तब्बल १३.६३ टक्के दराने परतावा दिला आहे. 

विशेष म्हणजे, सोन्याची किमतही या काळात मोठ्या प्रमाणात वाढली असून, भरघोस व्याजही मिळाले आहे. या बॉण्डने सोन्यासारखा परतावा दिला आहे. सूत्रांनी सांगितले की, परिपक्वता अवधीची किंमत रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) याच महिन्यात जारी केली जाईल. या आठ वर्षांच्या कालावधीत सोन्याच्या किमती दुपटीपेक्षा अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे सुवर्ण रोख्यांनी १३.६३ टक्के इतका आकर्षक परतावा दिला आहे. 

आरबीआयने नोव्हेंबर २०१५ मध्ये सुवर्ण रोख्यांची सुरूवात केली होती.   आरबीआयने अलीकडेच मुदतीपूर्वी पैसे काढून घेण्याबाबत योजना जाहीर केली होती. त्यांची किंमत ६,११६ रुपये निश्चित करण्यात आली होती. 

१२८% : एकूण वास्तविक परतावा
१०.८८% : चक्रवाढ व्याज 
१३.६६% : २०१५ पासून परतावा 
(गणना ३७ ग्रॅम सोन्याच्या खरेदीवर आधारित आहे)

Web Title: A golden return on 'this' investment; The price has also increased, interest will also be received!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं