Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारीच! पुन्हा सापडली पांढऱ्या सोन्याची मोठ्ठी खाणर, राजस्थानात लिथियमचा प्रचंड साठा

भारीच! पुन्हा सापडली पांढऱ्या सोन्याची मोठ्ठी खाणर, राजस्थानात लिथियमचा प्रचंड साठा

पालटेल देशाचे भाग्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 09:28 AM2023-05-09T09:28:56+5:302023-05-09T09:29:47+5:30

पालटेल देशाचे भाग्य

A huge mine of white gold has been rediscovered, huge reserves of lithium in Rajasthan | भारीच! पुन्हा सापडली पांढऱ्या सोन्याची मोठ्ठी खाणर, राजस्थानात लिथियमचा प्रचंड साठा

भारीच! पुन्हा सापडली पांढऱ्या सोन्याची मोठ्ठी खाणर, राजस्थानात लिथियमचा प्रचंड साठा

नवी दिल्ली : अलीकडेच जम्मू - काश्मिरात लिथियमचा प्रचंड साठा आढळला हाेता. त्यापेक्षाही जास्त साठा राजस्थानमध्ये सापडला आहे.  नागौर जिल्ह्यातील देगाना येथे हा साठा सापडला आहे, अशी माहिती भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या (जीएसआय) उच्चस्तरीय सुत्रांनी दिली. या साठ्यातून भारताची ८० टक्के लिथियमची गरज त्यातून भागविली जाऊ शकते. त्यातून भारताचे चीनवरील अवलंबित्व केवळ संपणारच नाही तर या क्षेत्रातील चीनची एकाधिकारशाही संपेल.  तसेच आखाती देशांप्रमाणे देशाचे भाग्यही पालटेल.

पदभरतीची डेडलाइन हुकणार! ७५ हजार रिक्त पदे, आधी जाहीर झालेली विविध विभागांची भरतीही रखडली

लिथियमपासून मोबाइल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहने आणि अन्य चार्जेबल बॅटऱ्या बनतात. लिथियमच्या बाबतीत भारत सध्या पूर्णत: विदेशी पुरवठ्यावर अवलंबून आहे. जीएसआयने डेगानाजवळ लिथियमचे साठे शोधल्यामुळे हे अवलंबित्व संपू शकते. लिथियमचे हे साठे डेगानातील रेंवत हिल्स भागात सापडले आहेत. या भागातून एकेकाळी टंगस्टनचा पुरवठा होत असे. पहिल्या महायुद्धाच्या काळात युद्धसाहित्य निर्मितीसाठी त्याचा मोठा वापर झाला होता.

लिथियम असेल हुकुमाचा एक्का

जगभरात सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे लक्ष्य केंद्रित झाले आहे. भारतातही ई-वाहनांची विक्री सातत्याने वाढत आहे.  

जगभरात पुढील ४ वर्षांमध्ये ३ हजार गिगा वॅट प्रति तास एवढी एकूण बॅटरी क्षमता निर्माण होणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या लिथियमची जगाची भूक भागविण्यासाठी भारताचा फार माेठा वाटा राहणार आहे.  

भारतातील दर्जा अत्युच्च

जगभरात सापडलेल्या लिथियमची क्षमता २२० पीपीएम एवढी आहे. 

जम्मू- काश्मीरमध्ये सापडलेल्या लिथियमची क्षमता ५०० पीपीएम एवढी आहे. त्यापासून बनविलेल्या बॅटरीची क्षमता दुप्पट राहू शकते.

७.३७ लाख टन लिथियम गेल्या वर्षी उत्खनन झाले होते.

९.६४ लाख टन लिथियमचे उत्खनन यावर्षी होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: A huge mine of white gold has been rediscovered, huge reserves of lithium in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.