Lokmat Money > बिझनेस न्यूज > २ रुपयांत एक लिटर पेट्रोल, इतक्यात तर चॉकलेटही मिळत नाही; कुठे-कुठे मिळतं स्वस्त पेट्रोल?

२ रुपयांत एक लिटर पेट्रोल, इतक्यात तर चॉकलेटही मिळत नाही; कुठे-कुठे मिळतं स्वस्त पेट्रोल?

Petrol Price: पेट्रोल डिझेलची गरज प्रत्येक देशात असते. याची किंमतही सगळीकडे वेगवेगळी आहे, पण आज आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगत आहोत जिथे पेट्रोलची किंमत इतकी कमी आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:00 IST2025-04-07T15:54:52+5:302025-04-07T16:00:35+5:30

Petrol Price: पेट्रोल डिझेलची गरज प्रत्येक देशात असते. याची किंमतही सगळीकडे वेगवेगळी आहे, पण आज आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगत आहोत जिथे पेट्रोलची किंमत इतकी कमी आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही.

A liter of petrol costs Rs 2 you can t even get chocolate for that much Where can you get cheap petrol Iran Libya | २ रुपयांत एक लिटर पेट्रोल, इतक्यात तर चॉकलेटही मिळत नाही; कुठे-कुठे मिळतं स्वस्त पेट्रोल?

२ रुपयांत एक लिटर पेट्रोल, इतक्यात तर चॉकलेटही मिळत नाही; कुठे-कुठे मिळतं स्वस्त पेट्रोल?

Petrol Price: पेट्रोल डिझेलची गरज प्रत्येक देशात असते. याची किंमतही सगळीकडे वेगवेगळी आहे, पण आज आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगत आहोत जिथे पेट्रोलची किंमत इतकी कमी आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही. एखाद्या देशात पेट्रोलची किंमत एवढी स्वस्त असू शकते यावर तुमचा विश्वास बसणार नाही. चला तर मग पाहूया असे देश जिकडे मिळतंय स्वस्त पेट्रोल.

इराण
इराणमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल फक्त २ रुपयात मिळत आहे. इराणमध्ये पेट्रोलची किंमत फक्त २.५४ रुपये आहे. खरं तर या देशात भरपूर तेल मिळतं आणि सरकारकडून चांगलं अनुदानही दिलं जातं.

लिबिया
लिबिया दुसऱ्या क्रमांकावर आहे, या देशात अत्यंत स्वस्त पेट्रोलही उपलब्ध आहे. जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल असलेल्या देशांमध्ये लिबिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथे पेट्रोलचा दर फक्त २.७१ रुपये प्रति लिटर आहे. आफ्रिकन देश लिबियामध्ये सर्वाधिक कच्चं तेल आहे, त्यामुळे येथे पेट्रोल खूप स्वस्त आहे.

व्हेनेझुएला
सर्वात स्वस्त पेट्रोल असलेल्या देशांच्या यादीत व्हेनेझुएला तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात पेट्रोलचा दर ३.०६ रुपये प्रति लिटर आहे. व्हेनेझुएलामध्ये कच्च्या तेलाचा जगातील सर्वात मोठा साठा आहे.

अंगोला
सर्वात स्वस्त पेट्रोल असलेल्या देशांच्या यादीत अंगोला चौथ्या क्रमांकावर आहे, येथे पेट्रोलची किंमत २८.६९ रुपये प्रति लिटर आहे.

इजिप्त
इजिप्तमध्ये पेट्रोलची किंमत २९.६५ रुपये प्रति लिटर आहे. हा देश या यादीत पाचव्या स्थान आहे.

अ‍ॅल्जेरिया
अल्जेरियात पेट्रोलचा दर २९.७४ रुपये प्रति लिटर आहे. या देशात कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूचे अनेक साठे आहेत, ज्यामुळे पेट्रोलचे दर कमी राहतात.

कुवेत
कुवेतमध्ये पेट्रोलचा दर २९.८२ रुपये प्रति लीटर आहे. येथे कच्च्या तेलाचे अनेक साठे असून पेट्रोलवर सरकारकडून अनुदानही दिलं जातं.

तुर्कमेनिस्तान
तुर्कमेनिस्तानमध्ये पेट्रोल ३७.४३ रुपये प्रति लिटर दरानं मिळत आहे.

मलेशिया
जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल देशांच्या यादीतही मलेशियाचंही नाव आहे. देशात पेट्रोलचा दर ४०.८५ रुपये प्रति लिटर आहे. मलेशिया जगभरात तेल निर्यात करतो, त्यामुळे येथे पेट्रोलचे दर कमी आहेत.

कझाकिस्तान
कझाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर ४१.३७ रुपये प्रति लिटर आहे. या देशातही कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूचे अनेक साठे आहेत, त्यामुळे या ठिकाणीही स्वस्त दरात पेट्रोल मिळतं.

या लेखात आम्ही तुम्हाला जगातील अशा १० देशांबद्दल सांगितलं जिथे पेट्रोल अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध आहे. भारतातील सर्वात स्वस्त पेट्रोल अंदमान आणि निकोबार बेटांवर मिळतं, जिथे त्याची किंमत सुमारे ८२ रुपये प्रति लिटर आहे.

Web Title: A liter of petrol costs Rs 2 you can t even get chocolate for that much Where can you get cheap petrol Iran Libya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.