Lokmat Money > बिझनेस न्यूज > ... त्यांचे मोठ्या प्रमाणात ग्राहक आमच्याकडे वळतील, Phonepe चे सीईओ नक्की कोणाबद्दल म्हणाले असं?

... त्यांचे मोठ्या प्रमाणात ग्राहक आमच्याकडे वळतील, Phonepe चे सीईओ नक्की कोणाबद्दल म्हणाले असं?

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादले. यानंतर त्यांच्यासमोरील समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 08:45 AM2024-02-20T08:45:13+5:302024-02-20T08:46:06+5:30

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादले. यानंतर त्यांच्यासमोरील समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

a lot of their customers will use our services Phonepe s CEO sameer nigam said paytm payments banks rbi action | ... त्यांचे मोठ्या प्रमाणात ग्राहक आमच्याकडे वळतील, Phonepe चे सीईओ नक्की कोणाबद्दल म्हणाले असं?

... त्यांचे मोठ्या प्रमाणात ग्राहक आमच्याकडे वळतील, Phonepe चे सीईओ नक्की कोणाबद्दल म्हणाले असं?

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादले. यानंतर त्यांच्यासमोरील समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दरम्यान, फोन पे चे फाऊंडर आणि सीईओ समीर निगम यांनी कोणाचंही नाव न घेता परिस्थितीवर भाष्य केलंय. फिनटेक कंपनीला त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपनीच्या ग्राहकांचा मोठा हिस्सा मिळू शकतो. त्यांनी प्रतिस्पर्धी कंपनीचं नाव घेतलं नसलं तरी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कारवाईमुळे पेटीएमवर काय परिणाम झाला याबद्दल ते उघडपणे बोलत होते.
 

मुंबई टेक वीकमध्ये एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, "मला वाटतं की आम्हाला फायदा होईल. कोणत्याही युनिटचं नुकसान असेल तर त्याचा काही भाग आम्हाला मिळेल. जर मी म्हटलं की मला त्यातला काही भाग मिळणार नाही, तर तुम्ही आम्हाला ढोंगी म्हणाल. मी तो सर्व हिस्सा मिळवण्याचा प्रयत्न करेन असं म्हटल्यास तुम्ही मला संधिसाधू म्हणाल. त्यामुळे मला दोन्हीच्या दरम्यान राहायला आवडेल," असं समीर निगम म्हणाले. 
 

यावेळी निगम यांनी फिटनेस कंपन्यांसाठी नियामक वातावरण आणि प्रतिस्पर्धी कंपनीवर रिझर्व्ह बँकेची कारवाई याबद्दल सविस्तर चर्चा केली. "गेल्या ८ वर्षांत मी इंडस्ट्रीत खूप काही शिकलो आहे. तसंच अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार नियामकानं प्रश्न उपस्थित केलेल्या कंपनीला उत्तर देण्यासाठी बराच वेळ देण्यात आला होता. मी केवळ रिझर्व्ह बँकेकडून आलेल्या विधानाच्या आधारेच बोलू शकतो," असं त्यांनी स्पष्ट केलं.
 

पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध
 

३१ जानेवारी रोजी रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर विविध निर्बंध लादण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत डिपॉझिट क्रेडिट ट्रान्झॅक्शनसोबत नवीन ग्राहक जोडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध २९ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले होते, परंतु त्याची अंतिम मुदत आता १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.

 

Web Title: a lot of their customers will use our services Phonepe s CEO sameer nigam said paytm payments banks rbi action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.