Join us  

Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 12:06 PM

Vedanta Group : वेदांता रिसोर्सेसचे संस्थापक आणि चेअरमन अनिल अग्रवाल (Anil Agarwal) हे आता मेटल किंग म्हणून ओळखले जातात, पण तुम्हाला माहित आहे का अनिल अग्रवाल रिकाम्या हाताने मुंबईत आले होते.

Vedanta Group : वेदांता रिसोर्सेसचे संस्थापक आणि चेअरमन अनिल अग्रवाल हे आता मेटल किंग म्हणून ओळखले जातात, पण तुम्हाला माहित आहे का अनिल अग्रवाल रिकाम्या हाताने मुंबईत आले होते. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अनिल अग्रवाल आज कोट्यवधी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. चला जाणून घेऊया अनिल अग्रवाल यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल.

वेदातापूर्वी ९ व्यवसाय

अनिल अग्रवाल हे बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहेत. वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी अनिल अग्रवाल यांनी शाळा सोडली आणि वयाच्या २० व्या वर्षी ते घर सोडून फक्त टिफिन बॉक्स घेऊन मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्यांना हे शहर पाहून आश्चर्य वाटलं. येथे त्यांनी अपार मेहनत केली आणि १९७० साली आपला पहिला व्यवसाय सुरू केला. हा भंगाराचा व्यवसाय होता. सुरुवातीला अनिल त्यांच्या व्यवसायानं चांगली कमाई केली.

१९७६ मध्ये अनिल अग्रवाल यांनी शमशेर स्टर्लिंग केबल कंपनी विकत घेतली, पण दुर्दैवानं त्यांचा व्यवसाय चालला नाही. त्यांना कर्मचाऱ्यांना पगारही देता आला नाही. यानंतर अग्रवाल यांनी ९ व्यवसाय सुरू केले, पण सर्व व्यवसाय अपयशी ठरले. सुमारे २० ते ३० वर्षे त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं पण त्यांनी हार मानली नाही.

आज मेटल क्षेत्रातील दिग्गज नाव

एकेकाळी भंगारापासून आपला व्यवसाय सुरू करणारे अनिल अग्रवाल आज माइन्स आणि मेटल क्षेत्रातील दिग्गज व्यावसायिक आहेत. वेदांत रिसोर्सेस मिनरल्स, गॅस आणि ऑईल काढण्याचं काम करते. कंपनीत सुमारे ६४ हजार कर्मचारी काम करतात. वेदांतची उत्पादनं जगभरात विकली जातात. आज वेदांताचे मार्केट कॅप सुमारे २ लाख कोटी रुपये आहे. अनिल अग्रवाल यांच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर अनिल अग्रवाल यांची नेटवर्थ आज १.६ अब्ज डॉलर्स म्हणजेच १३३९ कोटी रुपये आहे.

टॅग्स :व्यवसायप्रेरणादायक गोष्टी