नवी दिल्ली : अलीकडच्या काळात टेक क्षेत्रात एका नव्या शब्दाने खळबळ उडविली आहे, ताे म्हणजे ‘चॅटजीपीटी’. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हे ॲप मायक्राेसाॅफ्टने गेल्या वर्षी लाॅंच केले. आता त्याला स्पर्धा देण्यासाठी गुगलने ‘बार्ड’ या नावाने आपला चॅटबाेट लाॅंच केला आहे. तर चीनची बैदू या कंपनीनेही चॅटबाेट आणण्याची तयारी केली असून त्याची चाचणी अखेरच्या टप्प्यात आहे.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका ब्लाॅगद्वारे ‘बार्ड’बाबत माहिती दिली. त्याच्या बेसिक कामाबाबतही त्यांनी सांगितले. कंपनीच्या ‘लेम्डा’ अर्थात लँग्वेज माॅडेल डायलाॅग ॲप्लिकेशन या प्लॅटफाॅर्मवर ‘बार्ड’ काम करताे. सुरुवातीला काही निवडक ॲप टेस्टर्सना ‘बार्ड’चा ॲक्सेस दिला आहे. लवकरच सर्वसामान्यांसाठीही ताे खुला करण्यात येईल. इंटरनेटच्या विश्वातून ‘बार्ड’ माहिती गाेळा करण्यास सक्षम असेल. त्याउलट चॅटजीपीटीकडे ही क्षमता नाही.
‘बार्ड’ सांगणार काय गिफ्ट द्यावे
गुगलने ‘बार्ड’ला चॅटजीपीटीप्रमाणे डिझाईन केले आहे. आज जेवणात काय बनवावे, कुठे फिरायला जावे, मित्राच्य वाढदिवसाला काय भेट द्यावी, इत्यादी प्रश्नांची उत्तरे बार्ड देऊ शकणार आहे.
चीनचा ‘अर्नी बाेट’ही स्पर्धेत उतरणार
चीनमधील आघाडीची आयटी कंपनी ‘बैदू’ने एआयवर आधारित अर्नी बाेट तयार केला आहे. त्याची चाचणी सुरू असून मार्च किंवा एप्रिलमध्ये त्याचे लाॅंचिंग हाेण्याची शक्यता आहे. कंपनीने २०१९ मध्ये याचे भाषीय माॅडेल सादर केले हाेते.
‘बार्ड’ म्हणजे कविता किंवा शेराेशायरी करताे अशी व्यक्ती. विशेषत: वीरांवरील रचना करणारा कवी.
कशासाठी आणले ‘बार्ड’ ?
चॅटजीपीटीनंतर गुगलच्या सर्च इंजिनचे अस्तित्व संपणार, असे टेक क्षेत्राला काही काळापासून वाटत हाेते.
एआय ट्वीटबाेट्स गुगलच्या सर्च इंजिनचे रिझल्ट पेजदेखील नष्ट करतील अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळेच हा पर्याय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
गुगल यावर गेल्या सहा वर्षांपासून काम करत हाेते. महत्त्वाचे म्हणजे, गुगलकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सर्च इंजिनद्वारे माहितीचा खजिना गुगलकडे आहे.
त्यामुळे ‘चॅटजीटीपी’ आणि ‘बार्ड’मध्ये नजीकच्या काळात माेठी स्पर्धा दिसणार आहे.