मुंबई : फ्रँकलिन टेम्पलटन (भारत) यांनी फ्रँकलिन इंडिया मल्टी कॅप फंड (एफ.आय.एम.सी.एफ) नावाचा ओपन एंडेड मल्टी कॅप डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड सुरू करण्याचं जाहीर केलं आहे. दीर्घकालीन भांडवल मूल्य निर्माण करणे आणि लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून ते साध्य करणं, हे या फंडाचे उद्दिष्ट असेल. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप अशा प्रत्येक मार्केट कॅप श्रेणीत एफ.आय.एम.सी.एफ आपल्या एकूण मालमत्तेच्या किमान २५ टक्के गुंतवणूक कायम ठेवणार आहे आणि हे नियामक आवश्यकतांच्या अनुषंगाने असेल. ८ जुलै २०२४ रोजी नवीन फंड ऑफर सुरू होईल आणि २२ जुलै २०२४ रोजी बंद होईल व यादरम्यान रु. १० /- प्रति युनिट दराने युनिट्स उपलब्ध असतील.
इमर्जिंग मार्केट्स इक्विटी-इंडिया फ्रँकलिन टेम्पलटनचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर जानकीरमण आर. यांनी फंडची सुरुवात आणि त्यांच्या गुंतवणुकीच्या धोरणाबद्दल बोलताना सांगितले की, "मजबूत मॅक्रो फंडामेंटलमुळे भारताची अर्थव्यवस्था मध्यम कालावधीत मजबूत वाढीसाठी सज्ज झाली आहे आणि त्याद्वारे महागाईचा कल, विवेकी वित्तीय धोरणे आणि राजकीय स्थैर्य सुधारले आहे. कोव्हिडनंतर उज्ज्वल वाढीच्या दृष्टीकोनामुळे शेअर बाजारात दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. विविध बाजार क्षेत्रांमधील वाढीला खेचून आणण्यासाठी एफ.आय.एम.सी.एफची रचना केली गेली असून हे विशेषत: स्मॉल आणि मिड कॅप क्षेत्रासाठी केले गेले आहे, जी पारंपारिक इक्विटी फंडांमध्ये बऱ्याचदा कमी प्रतिनिधित्व असलेली क्षेत्रे आहेत. दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांना आमच्या मल्टी कॅप फंडात सहभागी होणे फायदेशीर ठरू शकते."
या फंडाची सुरुवात करण्याप्रसंगी बोलताना अविनाश सातवळेकर, अध्यक्ष, फ्रँकलिन टेम्पलटन-इंडिया म्हणाले की, "आमच्या इक्विटी टीमच्या ३० वर्षांहून अधिक काळ भारतातील इक्विटीचे व्यवस्थापन करण्याच्या व्यापक अनुभवाचा फायदा घेणारी आमची नवीन मल्टी कॅप रणनीती सादर करण्याची उत्सुकता आम्हाला लागली आहे. भारताची भक्कम लौकिक विकास क्षमता लक्षात घेता, विविध क्षेत्रे आणि मार्केट कॅप श्रेणींमध्ये अनेक संधी निर्माण होताना दिसू लागल्या आहेत. लवचिक परंतु शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून या उभरणाऱ्या संधींचा फायदा घेण्यासाठी एफ.आय.एम.सी.एफ ने स्वत:चे स्थान निश्चित केले आहे आणि तगडे वैविध्य शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही एक आदर्श निवड आहे."