वर्षाअखेरिस आयकर विभागानं एक नवा विक्रम केला आहे. आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार असेसमेंट ईयर २०२३-२४ साठी आतापर्यंत ८ कोटीहून अधिक इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) जमा करण्यात आले आहेत. यापूर्वी, करदात्यांनी असेसमेंट ईयर २०२२-२३ साठी एकूण ७,५१,६०,८१७ आयटीआर सादर केले होते. म्हणजेच, संपूर्ण गेल्या असेसमेंट ईयरमध्ये (२०२२-२३) भरलेल्या आयटीआरच्या संख्येपेक्षा यंदा अधिक आयटीआर वर्ष संपण्याच्या ३ महिने आधीच दाखल झाले आहेत.आयकर विभागानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. "आयकर विभागासाठी हा एक मैलाचा दगड आहे! असेसमेंट ईयर २०२३-२४ साठी आतापर्यंत आठ कोटींहून अधिक आयटीआर दाखल केले गेले आहेत. इथपर्यंत आम्ही प्रथमच पोहोचलो आहेत. असेसमेंट ईयर २०२२-२३ साठी एकूण ७,५१,६०,८१७ आयटीआर दाखल करण्यात आले होते. आम्हाला ८ कोटींचा आकडा गाठण्यात मदत केल्याबद्दल आयकर विभाग सर्व करदाते आणि कर व्यावसायिकांचे आभार मानतो," असं त्यांनी नमूद केलंय.
वर्षाअखेरिस आयकर विभागाचा नवा विक्रम, ८ कोटी ITR चा आकडा पार, करदात्यांचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 3:37 PM