अदानी विल्मरच्या शेअरमध्ये आज शुक्रवारी जबरदस्त तेजी बघायला मिळाली. कंपनीचा शेअर 5.24% ने वाधारून 369.75 रुपयांवर पोहोचला आहे. खरे तर, शेअरच्या या तेजीमागे एक मोठे कारणही आहे. एक वृत्तात म्हणण्यात आले आहे की, भारत मार्च 2025 पर्यंत कमी आयात कर दराने खाद्यतेलाच्या आयातीला परवानगी देणार आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या एका महिन्यात हा शेअर १६.२२% ने वधारला आहे. या वर्षी YTD मध्ये हा स्टॉक 39.51% ने घसरला आहे.
काय आहे बातमी? -
इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, "कच्च्या पाम तेलावरील, कच्च्या सूर्यफूल तेलावर आणि कच्च्या सोयाबीन तेलावरील कमी केलेले आयात शुल्क मार्च 2024 मध्ये संपणार होते. मात्र आता, रिफायनर्सना मार्च 2025 पर्यंत कमी शुल्कावर आयाता येणार आहे."
अदानी विल्मार बिझनेस ग्रुप हा अदानी समूह आणि सिंगापूरस्थित विल्मार इंटरनॅशनल यांच्यातील समान संयुक्त उपक्रम आहे. यात दोघांचाही हिस्सा 43.97% एवढा आहे. कंपनीचा शेअर सध्या ₹878 प्रति शेअर अथवा त्यांच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा 58% ने कमी व्यावहार करत आहेत.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)