न्यूयाॅर्क : गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात ई-वाहनांना मागणी वाढली आहे. पेट्राेल आणि डिझेल इंधनावर धावणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून या गाड्यांकडे वळण्याचे सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. आता ग्राहकांनाही याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे ई-वाहन उत्पादकांमध्ये सुरू झालेली स्पर्धा. अनेक नामांकित कंपन्या या स्पर्धेत उतरल्यामुळे पेट्राेल आणि इलेक्ट्रिक कारच्या किमती समान पातळीवर येण्याची शक्यता वाढली आहे.
भारतात ई-कारच्या किमती काही अपवाद वगळता साधारणत: १५ लाख रुपयांपर्यंत जातात. त्यातुलनेत सर्वात स्वस्त पेट्राेल कार ३.५ लाख रुपये एवढी आहे. तर एन्ट्री सेगमेंटच्या ई-कारची किंमत ८ लाख रुपयांच्या जवळपास आहे. किमती ठरण्यामागे दाेन प्रमुख घटक महत्त्वाचे असतात, ते म्हणजे माेटर आणि बॅटरी. सरकारने बॅटरीवरील शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे बॅटरीच्या किंमतीत कमी हाेतील. महत्त्वाचे म्हणजे, ई-वाहने आणि फ्लेक्स इंधन यात भविष्य असल्याने सर्वच नामांकित कार उत्पादक या क्षेत्रात उतरत आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढत आहे. याचा निश्चितच ग्राहकांना माेठा फायदा हाेणार आहे. (वृत्तसंस्था)
लिथियमच्या किमतीत घटइव्हीच्या बॅटरीसाठी वापरले जाणारे लिथियम आणि काेबाल्ट या रसायनांच्या किमती सुमारे ५० टक्क्यांनी घटल्या आहेत. लिथियमचे उत्खननही वाढविण्यात आले आहे. नवे स्राेतही शाेधण्यात येत आहे. त्यामुळे वाहनांच्या किमती कमी हाेण्याची चिन्हे आहेत.
कशामुळे किमती हाेणार कमी?nस्पर्धेमुळे सुरू झालेले प्राईस वाॅर सरकारी प्राेत्साहनnलिथियमच्या किमतीत झालेली घट बॅटरीचे दर खाली आणू शकते
अनेक कंपन्या उतरल्या बाजारातnअमेरिकेत फाेक्सवॅगन, निसान आणि ह्युंदाई या कंपन्या इव्हीच्या बाजारात उतरल्या आहेत. nया कंपन्या टेस्ला, जीएम आणि फाेर्ड या कंपन्यांना स्पर्धा देत आहेत. त्यामुळे किमतीत कपात करून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. nयाशिवाय जाे बायडेन यांनी इव्ही खरेदीवर माेठी करसवलतही जाहीर केली आहे.भारतातही किंमत घटण्याची अपेक्षाnभारतात ह्युंदाई, टाटा, महिंद्र आणि महिंद्र, एमजी माेटर्स, इत्यादी कंपन्याच्या ई-कार उपलब्ध आहेत. nमारुतीनेही काही वाहने सादर केली आहेत. मात्र, त्यांचे लाँचिंग झालेली नाही. काश्मीरमध्ये लिथियमचा फार माेठा साठा आढळला आहे. nत्यामुळे भारतातही या वाहनांच्या किंमती कमी हाेण्याची अपेक्षा वाढली आहे.
७५ लाखई-कारची विक्री भारतात २०२६पर्यंत हाेण्याचा अंदाज
५ काेटी राेजगार निर्मिती हाेणार वर्ष २०२५ पर्यंत इव्ही क्षेत्रातून