Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकदारांना झटका; या IPO ची लिस्टिंग अखेरच्या क्षणी रोखली, अनेकांचे पैसे अडकले

गुंतवणूकदारांना झटका; या IPO ची लिस्टिंग अखेरच्या क्षणी रोखली, अनेकांचे पैसे अडकले

BSE ने शेवटच्या क्षणी या IPO ची लिस्टिंग थांबवली, ज्यामुळे याचा GMP 135% वरुन झिरोवर आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 08:18 PM2024-09-17T20:18:09+5:302024-09-17T20:18:17+5:30

BSE ने शेवटच्या क्षणी या IPO ची लिस्टिंग थांबवली, ज्यामुळे याचा GMP 135% वरुन झिरोवर आला.

A shock to investors; The listing of this IPO was blocked at the last moment, leaving many people stranded | गुंतवणूकदारांना झटका; या IPO ची लिस्टिंग अखेरच्या क्षणी रोखली, अनेकांचे पैसे अडकले

गुंतवणूकदारांना झटका; या IPO ची लिस्टिंग अखेरच्या क्षणी रोखली, अनेकांचे पैसे अडकले

Share Market IPO :शेअर बाजारात दररोज नवनवीन IPO लिस्ट होत राहतात. यात गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवतात. मात्र, आज SME IPOची लिस्टिंग बंद करण्यात आली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे त्यात अडकले. स्टॉक एक्स्चेंज बीएसईने या आयपीओची लिस्टिंग थांबवली आहे. लिस्टिंग होण्यापूर्वी या IPO चा GMP 135 टक्के होता, जो आता '0' झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Trafiksol ITS Technologies Limited ची आज, म्हणजेच मंगळवारी BSE वर लिस्टिंग होणार होती, पण शेवटच्या क्षणी तक्रार आल्यानंतर BSE ने लिस्टिंग थांबवली. आता जोपर्यंत कंपनी BSE ला सर्व प्रश्नांची उत्तरे देत नाही, तोपर्यंत या IPO ची लिस्टिंग केली जाणार नाही. तसेच कंपनीला आयपीओमधून मिळालेली रक्कम वापरण्याची परवानगी नसेल. तक्रारीचे समाधानकारक निराकरण होईपर्यंत जमा झालेली रक्कम एस्क्रो खात्यात ठेवली जाईल.

गुंतवणूकदारांचे पैसे अडकले
दरम्यान, गुंतवणूकदारांना सुरुवातीला TrafficSol ITS Technologies कडून मल्टीबॅगर परतावा मिळणे अपेक्षित होते. कारण कंपनीला इश्यू किंमतीवर 135 टक्के ग्रे मार्केट प्रीमियम मिळत होता. पण, आता हा शून्य झाला आहे. ज्यांनी या IPO मध्ये पैसे गुंतवले होते, त्यांचे पैसे आता लिस्टिंग होईपर्यंत अडकले आहेत. लिस्टिंगची तारीख स्पष्ट नाही. 

कंपनी काय करते?
ही नोएडा स्थित कंपनी भारतातील महामार्गांसाठी वाहतूक व्यवस्थापन उपाय प्रदान करते. 

(टीप- शेअर मार्केटची गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: A shock to investors; The listing of this IPO was blocked at the last moment, leaving many people stranded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.