Lokmat Money > बिझनेस न्यूज > PNB च्या कोट्यवधी ग्राहकांना झटका, १ मे पासून 'अशा' ट्रान्झॅक्शन्सवर लागणार चार्जेस

PNB च्या कोट्यवधी ग्राहकांना झटका, १ मे पासून 'अशा' ट्रान्झॅक्शन्सवर लागणार चार्जेस

PNB च्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. १ मे पासून बँक नवीन नियम लागू करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 10:00 AM2023-04-01T10:00:54+5:302023-04-01T10:01:25+5:30

PNB च्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. १ मे पासून बँक नवीन नियम लागू करणार आहे.

A shock to millions of PNB customers the charges will be levied on these transactions from May 1 2023 online atm low balance | PNB च्या कोट्यवधी ग्राहकांना झटका, १ मे पासून 'अशा' ट्रान्झॅक्शन्सवर लागणार चार्जेस

PNB च्या कोट्यवधी ग्राहकांना झटका, १ मे पासून 'अशा' ट्रान्झॅक्शन्सवर लागणार चार्जेस

तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे म्हणजेच पीएनहीचे (PNB) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. PNB १ मे पासून नवीन नियम लागू करणार आहे. या नियमानुसार, तुमच्या खात्यात पैसे नसतील आणि तुम्ही एटीएममधून पैसे काढले तर यासाठी तुम्हाला शुल्क भरावं लागू शकतं. पीएनबीच्या वेबसाइटनुसार, तुमच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यास आणि एटीएम व्यवहार पूर्ण होत नसल्यास, तुमच्याकडून रोख पैसे काढण्याच्या व्यवहारांसाठी १० रुपये + जीएसटी ​​आकारला जाईल. 

‘प्रिय ग्राहक खात्यात पुरेशी रक्कम नसेल तर एटीएममधून रोख पैसे काढण्याच्या व्यवहारांसाठी १ मे २०२३ पासून १० रुपये + जीएसटी आकारला जाईल,’ असं पीएनबी बँकेकडून सांगण्यात आलंय.

डेबिट शुल्कात बदल
PNB नं सांगितल्याप्रमाणं, बँक डेबिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड जारी करण्याचे शुल्क आणि वार्षिक देखभाल शुल्कामध्ये बदल करत आहे. याशिवाय डेबिट कार्डद्वारे केलेल्या PoS आणि ई-कॉमर्स व्यवहारांवर शुल्क आकारलं जाईल. परंतु ग्राहकाच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसेल आणि त्यामुळे व्यवहार करता आले नाहीत तरच हे शुल्क आकारलं जाईल. म्हणजेच, जेव्हा तुम्ही Amazon Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून वस्तू खरेदी करता आणि POS आणि डेबिट कार्डने पेमेंट करता, परंतु काही कारणास्तव तुमच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसते आणि व्यवहार अयशस्वी होतो, तेव्हाही बँक दंड आकारण्याचा विचार करत आहे.

Web Title: A shock to millions of PNB customers the charges will be levied on these transactions from May 1 2023 online atm low balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.