Lokmat Money > बिझनेस न्यूज > नव्या वर्षात सर्वसामान्यांना झटका! मदर डेअरीने दुसऱ्यांदा वाढवले दर, जाणून किती रुपयांनी महागले दूध

नव्या वर्षात सर्वसामान्यांना झटका! मदर डेअरीने दुसऱ्यांदा वाढवले दर, जाणून किती रुपयांनी महागले दूध

2022 मधील काहीच दिवस राहिले आहेत. काही दिवसात आपण 2022 मध्ये प्रवेश करणार आहे. नव्या वर्षात सर्वसामान्य ग्राहकांना झटका बसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 04:22 PM2022-12-26T16:22:49+5:302022-12-26T16:23:11+5:30

2022 मधील काहीच दिवस राहिले आहेत. काही दिवसात आपण 2022 मध्ये प्रवेश करणार आहे. नव्या वर्षात सर्वसामान्य ग्राहकांना झटका बसणार आहे.

A shock to the common people in the new year! Mother Dairy hiked rates for the second time, knowing how much milk has become expensive | नव्या वर्षात सर्वसामान्यांना झटका! मदर डेअरीने दुसऱ्यांदा वाढवले दर, जाणून किती रुपयांनी महागले दूध

नव्या वर्षात सर्वसामान्यांना झटका! मदर डेअरीने दुसऱ्यांदा वाढवले दर, जाणून किती रुपयांनी महागले दूध

2022 मधील काहीच दिवस राहिले आहेत. काही दिवसात आपण 2022 मध्ये प्रवेश करणार आहे. नव्या वर्षात सर्वसामान्य ग्राहकांना झटका बसणार आहे. पुन्हा एकदा दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय मदर डेअरीने घेतला आहे, मंगळवारपासून मदर डेअरीच्या दुधाचे दर दोन रुपयांनी वाढवले आहेत.

गाईचे दूध आणि टोकनयुक्त दुधाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे मदर डेअरीने म्हटले आहे. मदर डेअरीने उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे दिल्ली-एनसीआर बाजारात दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मदर डेअरी मदर डेअरी दिल्ली एनसीआरमध्ये दररोज 30 लाख लीटर दूध पुरवते. 

Share Market : शेअर बाजारात पुन्हा 'हिरवळ'; कोरोनाच्या भीतीने कोसळलेला सेन्सेक्स तितक्याच वेगाने सावरला!

मदर डेअरीने फुल क्रीम दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे, तर टोन्ड दूध 51 रुपयांवरून 53 रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहे. दुहेरी टोन्ड दुधाच्या दरात ४५ रुपयांवरून ४७ रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. मदर डेअरीने गाईचे दूध आणि टोकन दुधाच्या दरात वाढ केलेली नाही.

मदर डेअरीने गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्येच दुधाचे दर वाढवले ​​होते. कंपनीने दिल्ली एनसीआरमध्ये फुल क्रीम दुधाच्या दरात प्रति लिटर 1 रुपये आणि म्हशीच्या दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. मदर डेअरीने यावर्षी दुधाच्या दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ केली आहे.

Web Title: A shock to the common people in the new year! Mother Dairy hiked rates for the second time, knowing how much milk has become expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.