Lokmat Money > बिझनेस न्यूज > डेबिट कार्ड घरीच विसरलात! काळजी नको, आता कार्ड नसतानाही काढता येतात ATM मधून पैसे 

डेबिट कार्ड घरीच विसरलात! काळजी नको, आता कार्ड नसतानाही काढता येतात ATM मधून पैसे 

Cardless Cash Withdrawal : तुम्हाला तुमचे एटीएम कार्ड घेऊन जाण्यात अडचण येत असेल किंवा तुम्ही तुमचे एटीएम कार्ड घरी विसरला असाल तर तुम्ही एटीएममधून सहज पैसे काढू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 08:42 PM2023-02-26T20:42:09+5:302023-02-26T20:43:10+5:30

Cardless Cash Withdrawal : तुम्हाला तुमचे एटीएम कार्ड घेऊन जाण्यात अडचण येत असेल किंवा तुम्ही तुमचे एटीएम कार्ड घरी विसरला असाल तर तुम्ही एटीएममधून सहज पैसे काढू शकता.

a step by step guide on withdrawing cash from atm using upi apps without debit card | डेबिट कार्ड घरीच विसरलात! काळजी नको, आता कार्ड नसतानाही काढता येतात ATM मधून पैसे 

डेबिट कार्ड घरीच विसरलात! काळजी नको, आता कार्ड नसतानाही काढता येतात ATM मधून पैसे 

नवी दिल्ली : डेबिट कार्डद्वारे (Debit Card) एटीएम मशीनमधून पैसे काढण्याच्या सुविधेबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र, आता नवीन टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही कार्ड नसतानाही एटीएम मशीनमधून पैसे काढू शकता. तुम्हाला तुमचे एटीएम कार्ड घेऊन जाण्यात अडचण येत असेल किंवा तुम्ही तुमचे एटीएम कार्ड घरी विसरला असाल तर तुम्ही एटीएममधून सहज पैसे काढू शकता.

जर तुम्ही BHIM, Paytm, PhonePe, Google Pay, Amazon Pay सारखे UPI अॅप्स वापरत असाल तर तुम्ही डेबिट कार्डशिवाय एटीएममधून सहज पैसे काढू शकता. दरम्यान, UPI द्वारे कार्डलेस कॅश विड्रॉलची सुविधा सध्या फक्त निवडक बँक एटीएममध्ये उपलब्ध आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँकेच्या एटीएमचा समावेश आहे.

UPI अॅपद्वारे एटीएममधून पैसे कसे काढायचे?
>> एटीएमवरील स्क्रीनमध्ये Cash Withdrawal चा ऑप्शन निवडा.
>> आता स्क्रीनमध्ये UPI चा ऑप्शन निवडा.
>> यानंतर एक QR कोड येईल.
>> तुमच्या मोबाईलमध्ये UPI अॅप उघडा आणि QR कोड स्कॅन करा.
>> आता रक्कम टाका. (या सुविधेद्वारे तुम्ही एकावेळी जास्तीत जास्त 5000 रुपये काढू शकता.)
>> UPI पिन एंटर करा आणि नंतर Proceed वर टॅप करा.
>> आता तुम्हाला एटीएम मशीनमधून रोख रक्कम मिळले.

काय आहे UPI?
दरम्यान,  UPI ही एक रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देते. विशेष म्हणजे UPI च्या माध्यमातून तुम्ही दिवसा किंवा रात्री कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता. UPI द्वारे, तुम्ही एक बँक खात्याला अनेक UPI अॅप्सशी लिंक करू शकता. तसेच, एका UPI अॅपद्वारे अनेक बँक खाती ऑपरेट केली जाऊ शकतात. विशेष म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी यापैकी एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला मनी ट्रान्सफरची सुविधा देते.

Web Title: a step by step guide on withdrawing cash from atm using upi apps without debit card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.