Lokmat Money > बिझनेस न्यूज > दोन हजाराच्या नोटा बंद होऊन वर्ष उलटलं, अजूनही ७११७ कोटी रुपयांच्या नोटा RBI कडे परतल्या नाहीत

दोन हजाराच्या नोटा बंद होऊन वर्ष उलटलं, अजूनही ७११७ कोटी रुपयांच्या नोटा RBI कडे परतल्या नाहीत

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार नोटांच्या बाबतीत एक मोठी अपडेट दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 01:56 PM2024-10-02T13:56:59+5:302024-10-02T13:57:47+5:30

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार नोटांच्या बाबतीत एक मोठी अपडेट दिली आहे.

A year has passed since the demonetisation of Rs 2000 notes, still Rs 7117 crore notes have not returned to RBI | दोन हजाराच्या नोटा बंद होऊन वर्ष उलटलं, अजूनही ७११७ कोटी रुपयांच्या नोटा RBI कडे परतल्या नाहीत

दोन हजाराच्या नोटा बंद होऊन वर्ष उलटलं, अजूनही ७११७ कोटी रुपयांच्या नोटा RBI कडे परतल्या नाहीत

RBI : देशात दोन हजारांच्या नोटा बंद करुन दीड वर्ष झाली आहेत. दोन हजारांच्या नोटा परत घेण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुदत दिली होती, या काळात मोठ्या प्रमाणात दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या आहेत. दोन हजारांच्या नोटांबाबत आता आरबीआयने एक अपडेट दिली आहे. अजूनही पूर्ण नोटा आरबीआयकडे आलेल्या नाहीत. आतापर्यंत बँकेकडे ९८ टक्के नोटा परत आल्या आहेत. अजूनही बाहेर ७,११७ कोटी रुपयांच्या नोटा ओरबीआयलाकडे आलेल्या नाहीत.

Iran vs Israel: इराण-इस्रायल संघर्षामुळे जगभरातील शेअर बाजार दबावात; भारतावर काय होईल परिणाम?

आरबीआयने १९ मे २०२३ रोजी चलनातून २,००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याची घोषणा केली होती. १९ मे २०२३ पर्यंत, चलनात असलेल्या २,००० रुपयांच्या बँक नोटांचे एकूण मूल्य ३.५६ लाख कोटी रुपये होते. ३० सप्टेंबर २०२४ रोजी ते ७,११७ कोटी रुपयांवर घसरले. आरबीआयने निवेदनात म्हटले आहे की, ' चलनात असलेल्या २,००० रुपयांच्या नोटांपैकी ९८ टक्के नोटा ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध होत्या.

१९ मे २०२३ पासून दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या शाखेमध्ये सुविधा सुरू केली होती. RBI चे इश्यू ऑफिस देखील ९ ऑक्टोबर २०२३ पासून व्यक्ती आणि संस्थांकडून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी २,००० रुपयांच्या बँक नोटा परत घेत होते. या दरम्यान अनेकांनी  या नोटा देशातील भारतीय पोस्टद्वारे RBI च्या कोणत्याही इश्यू ऑफिसला पाठवल्या. 

अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुअनंतपुरम या शाखेमध्ये या नोटा बदलून दिल्या जात होत्या. 
 

Web Title: A year has passed since the demonetisation of Rs 2000 notes, still Rs 7117 crore notes have not returned to RBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.