Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयकॅडची सीपीए १२ एप्रिलला

आयकॅडची सीपीए १२ एप्रिलला

वाणिज्य बातमी ... १० बाय ३ ...

By admin | Published: February 10, 2015 12:56 AM2015-02-10T00:56:24+5:302015-02-10T00:56:24+5:30

वाणिज्य बातमी ... १० बाय ३ ...

Aacad CPA on 12th of April | आयकॅडची सीपीए १२ एप्रिलला

आयकॅडची सीपीए १२ एप्रिलला

णिज्य बातमी ... १० बाय ३ ...

- उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना शिष्यवृत्ती : नोंदणी प्रक्रिया सुरू

नागपूर : जेईई, मेडिकल आणि फाऊंडेशनकरिता मध्य भारतात आघाडीचे प्रशिक्षण केंद्र आयकॅडमध्ये २०१५-१७ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. आयकॅडची प्रवेश परीक्षा सीपीए १२ एप्रिल २०१५ रोजी घेण्यात येणार आहे. यावर्षी इयत्ता दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी सीपीए परीक्षेसाठी पात्र आहेत.
गेल्यावर्षी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नागपुरात उत्तम निकाल दिला. आयकॅडचा रूपांशू गणवीर एससी वर्गवारीत अखिल भारतीय स्तरावर पहिला आणि कॉमन मेरिट लिस्टमध्ये २४ वा होता. त्याने कजाकस्थान येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि रौप्य पदक मिळविले. याशिवाय नागपुरातील पाच टॉपरपैकी चार आयकॅडियन होते. रूपांशू गणवीरसह आयकॅडियन आदित्य भागवत (एआयआर ४०४) आणि अनुराग भारद्वाज (एआयआर ४४५) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. याशिवाय बीसॅटमध्येही विद्यार्थ्यांनी अतुलनीय कामगिरी केली. आठ विद्यार्थ्यांनी ३५० पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. अमेय प्रभुणे हा अखिल भारतीय बीसॅटमध्ये ४५० पैकी ४३१ गुण मिळवित टॉपर आला. याशिवाय बारावीच्या परीक्षेतही उत्तम गुण संपादन केले. राज्य बोर्ड परीक्षेत सर्वसाधारण वर्गवारीत ९८ टक्के गुण मिळवीत अनुराग भारद्वाज आणि राखीव वर्गवारीत रूपांशू गणवीरने ९५ टक्के गुण संपादन करीत पहिले टॉपर ठरले. या महिन्यात गणित, फिजिक्स व केमेस्ट्री या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तीनजण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड तर २० विद्यार्थी राष्ट्रीय ऑलिम्पियाड व भारत सरकारच्या स्पर्धा परीक्षेत तसेच ३४ विद्यार्थी विभागीय ऑलिम्पियाडमध्ये पात्र ठरले. युरोपियन वर्ल्ड मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये प्रांजल वराडे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अनुज आपटेने आशियन फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये ब्रॉन्झ पदक पटकाविले.
सीपीए परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमध्ये २० ते १०० टक्र्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. सीपीए परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी अथवा आयकॅडच्या प्रशिक्षण केंद्रावर करता येईल. ऑनलाईन नोंदणी संस्थेच्या वेबसाईटवर फॉर्म व ऑनलाईन शुल्क भरून करता येईल. संस्थेचे सदर केंद्र लवकरच सुरू होणार आहे. मुख्य कार्यालय टिळकनगर येथे आहे. पूर्व नागपुरात हनुमाननगर येथे केंद्र आहे.

Web Title: Aacad CPA on 12th of April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.